'भाजपात अपमानच मिळाला', ज्योतिरादित्यंचे खास समंदर पटेल ८०० गाड्या घेऊन काँग्रेसमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 10:19 AM2023-08-20T10:19:28+5:302023-08-20T10:19:54+5:30

काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपात जाणाऱ्यांपैकी पाच नेते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत.

'BJP insulted me', Jyotiraditya scindia's aid Samandar Patel entry in Congress with 800 vehicle party workers madhya pradesh politics | 'भाजपात अपमानच मिळाला', ज्योतिरादित्यंचे खास समंदर पटेल ८०० गाड्या घेऊन काँग्रेसमध्ये 

'भाजपात अपमानच मिळाला', ज्योतिरादित्यंचे खास समंदर पटेल ८०० गाड्या घेऊन काँग्रेसमध्ये 

googlenewsNext

मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदेंचा खेळ त्यांच्यावर उलटू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपात जाणाऱ्यांपैकी पाच नेते पुन्हा काँग्रेसमध्ये आले आहेत. नुकतेच शिंदे यांचे खास समंदर पटेल यांनी मोठ्या लवाजम्यासह माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 

यावेळी समंदर पटेल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. भोपाळमध्ये काँग्रेसच्या कार्यालयात पक्ष प्रवेश करण्यासाठी पटेल यांनी ८०० गाड्यांचा ताफा आणला होता. यामध्ये कार्यकर्ते भरून आणले होते. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे एक निष्ठावंत आणि मध्य प्रदेश भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे आणि त्यांच्या निष्ठावंत आमदारांनी मार्च 2020 मध्ये कमलनाथ सरकार पाडून काँग्रेसविरोधात बंड केले होते. तेव्हा नीमचच्या जवाद भागातील 52 वर्षीय ओबीसी नेता समंदर पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

'भाजपने मला स्वीकारले नाही आणि माझ्या समर्थकांचा आदरही केला नाही. कार्यकारिणीचा सदस्य असूनही मला पक्षाच्या कार्यक्रमांना कधीही बोलावले गेले नाही. खरेतर माझ्या समर्थकांना खोट्या खटल्यांमध्ये अडकवण्यात आले', असा आरोप समंदर पटेल यांनी केला. काँग्रेसमध्ये परतणारा मी शिंदे गटातील पाचवा व्यक्ती आहे. कारण मला भाजपमध्ये अपमानित वाटले, भाजपाचे नेते माझ्या भागात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, अशी टीका पटेल यांनी केली. 

1993 पासून माधवराव शिंदे आणि त्यांचा मुलगा ज्योतिरादित्य शइंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी 2018 ची विधानसभा निवडणूक जवाद येथून अपक्ष म्हणून लढवली आणि 35,000 मते मिळविली होती. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले होते. जवादमधील 7000 लोक कालच्या पक्ष प्रवेशावेळी हजर होते, असा दावा पटेल यांनी केला आहे.  
 

Web Title: 'BJP insulted me', Jyotiraditya scindia's aid Samandar Patel entry in Congress with 800 vehicle party workers madhya pradesh politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.