भाजपा आमदाराने काढली स्वपक्षीय महिला खासदाराची छेड, काँग्रेसचा आरोप, मिळालं असं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:06 PM2023-09-07T18:06:29+5:302023-09-07T18:06:52+5:30
Madhya Pradesh News: मध्य प्रदेश काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत राज्यातील चुरहट मतदारसंघातील भाजपा आमदार शरदेंदू तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या खासदार रिती पाठक यांची छेड काढल्याचा आरोप केला आहे.
मध्य प्रदेशकाँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत राज्यातील चुरहट मतदारसंघातील भाजपा आमदार शरदेंदू तिवारी यांनी आपल्याच पक्षाच्या खासदार रिती पाठक यांची छेड काढल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर यासंदर्भातील व्हिडीओसुद्धा शेअर केले आहेत. तसेच ही बाब खूप लाजिरवाणी असल्याचेही म्हटले आहे. सरकारी कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोरच भाजपा खासदारांची छेड काढण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
@INCMP या हँडलवरून व्हिडीओ शेअर करताना लिहिण्यात आलं आहे. की, बेशरम भाजपा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासमोरच भाजपाच्या महिला खासदाराची छेड काढली गेली. भाजपा खासदार रीति पाठक यांच्यासोबत भर मंचावर भाजपा आमदार शरदेंदू तिवारी यांनी जे काही केलं ते आमच्या संस्कृती आणि संस्कारांविरोधात आहे. शिवराजजी भाजपा नेत्यांपासून मुलींना वाचवा.
दरम्यान, काँग्रेसने केलेल्या या आरोपांना सीधी येथील भाजपा खासदार रिती पाठक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसचे आरोप पाहून मला हसू येतंय. काँग्रेसकडे काही काम उरलेलं नाही वाटतं. ते इतरांनाही स्वत:सारखेच समजतात. काँग्रेस या प्रकरणाकडे आपल्याच नजरेनं पाहत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून जे काही लिहिलं आहे, ते सर्व यांच्या पक्षामध्ये होतं. आमच्याकडे अशी परंपरा नाही. भाजपा एक कुटुंब आहे. या पक्षामध्ये भाऊ बहिणीच्या पवित्र संबंधांसह काम केलं जातं. काँग्रेसची चुकीची विचारसरणी असून, त्यांच्याकडून चुकीची विधानं केलं जात आहेत.
बेशर्म बीजेपी, शर्मसार मध्यप्रदेश
— MP Congress (@INCMP) September 6, 2023
मुख्यमंत्री शिवराज के सामने ही बीजेपी की महिला सांसद से छेड़छाड़, बीजेपी सांसद रीति पाठक के साथ भरे मंच पर बीजेपी विधायक शर्तेन्दु तिवारी ने जो किया वो हमारी संस्कृति और संस्कार के विपरीत है।
शिवराज जी,
बीजेपी नेताओं से बेटी बचाओ। pic.twitter.com/MrPUuWUi8b
दरम्यान, भाजपा आमदार शरदेंदू तिवारी यांनी सांगितले की, भाऊ बहिणीच्या नात्याची समज काँग्रेसींना नाही आहे. रिती पाठक ह्या मला राखी बांधतात. कार्यक्रमामध्ये दोरी पकडण्यासाठी मी हात पुढे केला होता. हाच व्हिडीओ वारंवार रिपीट करून दाखवला जात आहे. प्रत्यक्षात आपल्या पराभवाच्या भीतीने काँग्रेसची मानसिकता कुत्सित आणि विकृत बनली आहे. या प्रकरणी मी काँग्रेसला सोडणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन.