भाजपला धक्का; मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार, एक्झिट पोलचे आकडे समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 06:07 PM2023-11-30T18:07:02+5:302023-11-30T18:08:22+5:30
येत्या 3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.
5 State Assembly Elections Exit Poll Results 2023 : देशातील पाच राज्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. शेवटच्या दिवशी, म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांसाठी मतदान झाले. हे मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल समोर येऊ लागले आहेत.
तेलंगणात भाजपाच खरा खेळ करणार! बीआरएसची सत्ता जाणार? काँग्रेस जोरदार मुसंडी मारण्याचा अंदाज
येत्या 3 डिसेंबर रोजी सर्व राज्यातील मतमोजणी होणार आहे. तत्पुर्वी एक्झिट पोलच्या आकडेवारीवरुन निकालांचा अंदाज लावला जात आहे. एक्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशातकाँग्रेस बाजी मारण्याची शक्यता आहे. येथे काँग्रेसला येथे 111-121, तर भाजपला 106-116 जागा मिळण्याची शक्यता आहे. राज्यात बहुमताचा आकडा 116 आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपा-काँग्रेसची अटीतटीची लढत; सरकार बनवण्यासाठी ५ जागांचा फरक
छत्तीसगडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण जागा ९० आहेत. येथे काँग्रेसला 40-50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे. येथे बहुमताचा आकडा 46 आहे.
2018 मध्ये मध्य प्रदेशात काय निकाल लागला?
मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. 2018 च्या निवडणुकीत भाजपला 109, काँग्रेसला 114, बसपाला 2 आणि इतरांना 7 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसचे काही आमदार भाजपात सामील झाल्यामुळे काँग्रेसची सत्ता कोसळून भाजपची सत्ता आली होती.