'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 06:16 PM2023-10-02T18:16:36+5:302023-10-02T18:18:00+5:30

MP Election 2023: देशाने विकासविरोधी लोकांना सहा दशके दिली, त्यांनी काहीच कामे केली नाही.

madhya pradesh election 'then they used to divide the society in the name of caste and even today', PM Modi's attack | 'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

'तेव्हाही जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे अन् आजही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

googlenewsNext

Madhya Pradesh Election: या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सोमवारी (2 ऑक्टोबर) त्यांनी ग्वाल्हेरमध्ये राज्यासाठी 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त  प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीकाही केली.

'जातीच्या नावावर समाजात फूट...'
विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाने विकासविरोधी लोकांना सहा दशके दिली होती. एवढी कामे 9 वर्षात होऊ शकतात, तर 60 वर्षात किती कामे झाली असती. ते काहीच करू शकले नाही, हे त्यांचे अपयश आहे. तेव्हाही ते गरिबांच्या भावनांशी खेळायचे, आजही ते गरिबांच्या भावनाशी खेळत आहेत. तेव्हाही ते जातीच्या नावावर समाजात फूट पाडायचे आणि आजही तेच पाप करत आहेत. तेव्हाही ते भ्रष्टाचारात बुडाले होते आणि आजही ते भ्रष्टाचारात बुडले आहेत.

'जाती-धर्माच्या नावाने गोंधळ घालतात'
पंतप्रधान पुढे म्हणतात, काँग्रेसच्या 'घमंडिया' आघाडीचे नेते महिलांबद्दल किती अपमानास्पद गोष्टी बोलत आहेत, हे आपण रोज पाहत आहोत. महिलांना त्यांचे हक्क मिळावेत असे त्यांना वाटत नाही, म्हणूनच ते अशी वक्तव्ये करतात. ते समाजाला जातीत विभागण्याचे काम करत आहेत. ते धर्माच्या नावाने गोंधळ घालत आहेत. देशाच्या प्रगतीचा द्वेष करणे, एवढेच काम ते करतात, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

महिला आरक्षणावर भाष्य
महिला आरक्षणावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, अनेक सरकारे आली, लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचे खोटे आश्वासन देऊन आमच्या महिलांकडे वारंवार मते मागितली. पण त्यांनी कधीही कायदा बनववला नाही. संसदेत मोदीने हमी दिली आणि आज 'महिला शक्ती कायदा' प्रत्यक्षात आला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Web Title: madhya pradesh election 'then they used to divide the society in the name of caste and even today', PM Modi's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.