मध्य प्रदेश : काँग्रेस आमदाराच्या २८ वर्षीय सुनेनं संपवलं जीवन; तीन वर्षांपूर्वी झालं होत लग्न 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 07:14 PM2023-12-14T19:14:00+5:302023-12-14T19:14:33+5:30

मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराच्या सुनेने आत्महत्या केली आहे.

Monika, daughter-in-law of Congress MLA Sohan Lal Valmik from Parasia constituency in Chhindwara, Madhya Pradesh, has ended her life | मध्य प्रदेश : काँग्रेस आमदाराच्या २८ वर्षीय सुनेनं संपवलं जीवन; तीन वर्षांपूर्वी झालं होत लग्न 

मध्य प्रदेश : काँग्रेस आमदाराच्या २८ वर्षीय सुनेनं संपवलं जीवन; तीन वर्षांपूर्वी झालं होत लग्न 

मध्य प्रदेशातीलकाँग्रेस आमदाराच्या सुनेने आत्महत्या केली आहे. छिंदवाडा येथील पारसिया मतदारसंघातील काँग्रेस आमदार सोहन लाल वाल्मिकी यांच्या सुनेने गुरुवारी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार, काँग्रेस आमदाराची सून मोनिका वाल्मिकी (२८) या त्यांच्या मांगली बाजार येथील निवासस्थानी संशयास्पद स्थितीत आढळून आल्या. मोनिका यांना कुटुंबीयांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मृत मोनिका यांचा विवाह परासियाचे आमदार सोहन वाल्मिकी यांचा मुलगा आदित्य याच्याशी तीन वर्षांपूर्वी झाला होता. पोलिसांनी मृतदेह जिथे सापडला ती खोली खाली केली आहे. पोलिसांचे पथक वाल्मिकी कुटुंबीयांच्या मदतीने घटनेशी संबंधित पुरावे गोळा करणार आहे. आमदार वाल्मिकी यांचा मोठा मुलगा आदित्य याची पत्नी मोनिका यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळ सील करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. सध्या तरी या घटनेमागची कारणे समोर आलेली नाहीत. घटनेवेळी घरात कोण होते आणि कोणी पहिले हे अद्याप समजू शकलेले नाही.

Web Title: Monika, daughter-in-law of Congress MLA Sohan Lal Valmik from Parasia constituency in Chhindwara, Madhya Pradesh, has ended her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.