"देशात पैसा नाही, अदानींचे हजारो कोटी माफ केले", प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 03:43 PM2023-10-28T15:43:31+5:302023-10-28T15:44:35+5:30
मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत राजकीय सभा आणि नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील दमोह येथे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत प्रियांका गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
सध्याचे राज्यातील सरकार लवकरच राजीनामा देणार आहे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. तसेच, रोजगाराच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, गेल्या तीन वर्षांत केवळ २१ नोकऱ्या दिल्या आहेत.आपल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी उद्योगपतींवरून सुद्धा केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. देशातील जेवढी मोठी संपत्ती होती, ती आपल्या उद्योगपती मित्रांच्या ताब्यात देण्यात आली आहे. देशात पैसा नाही, पण अदानींसारख्या उद्योगपतींचे हजारो कोटी तुम्ही माफ केले, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधाला.
उत्तर प्रदेशातही रोजगाराच्या नावाखाली केवळ घोटाळेच होत आहेत. राज्यात अजूनही अनेक पदे रिक्त आहेत, मात्र भरती बंद ठेवण्यात आली आहे. रोजगाराची साधने जवळपास बंद झाली आहेत, असे प्रियांका गांधी म्हणाल्या. याचबरोबर, जाहीर सभेला संबोधित करताना प्रियांका गांधी यांनीही जातीय जनगणनेचा उल्लेख केला. जातीय जनगणनेचे समर्थन करताना त्या म्हणाल्या की, जातीय जनगणना व्हावी अशी आमची इच्छा आहे.
मध्य प्रदेश में रोजगार के मौके बेहद कम हैं, इसलिए यहां पलायन बहुत हो रहा है।
— Congress (@INCIndia) October 28, 2023
पिछले 3 साल में मध्य प्रदेश की BJP सरकार ने सिर्फ 21 नौकरियां दी हैं।
: मध्य प्रदेश में @priyankagandhi जी pic.twitter.com/xm767boTDx
नुकतीच बिहारमध्ये जातीय जनगणना करण्यात आली, त्यात असे आढळून आले की, तेथील 84 टक्के लोक एससी, एसटी आणि ओबीसी आहेत. परंतु, ही आकडेवारी लक्षात घेऊन रोजगारावर नजर टाकली, तर मोठ्या नोकऱ्यांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व होत नसल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणूक मध्य प्रदेशातील जनतेचे भविष्य घडवणारी निवडणूक आहे, असेही रॅलीत संबोधित करताना प्रियांका गांधी म्हणाल्या.