"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 03:57 PM2024-05-07T15:57:54+5:302024-05-07T15:58:15+5:30
मोदी म्हणाले, 'आपल्या एका मताने भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले, कलम 370 (जे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते.) हटवले. एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती बनवले आणि आपल्या एका मताने भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे."
आज भारत देश इतिहासाच्या अत्यंत महत्वपूर्ण वळणावर उभा आहे. आपल्याला ठरवायचे आहे, भारतात व्होट जिहाद चालणार की राम राज्य चालणार. पाकिस्तानात दहशतवादी भारताविरोधात जिहादची धमकी देत आहेत आणि येथील काँग्रेसच्या लोकांनीही मोदी विरोधात व्होट जिहाद करा, अशी घोषणा केली आहे. अर्थात मोदी विरोधात एका विशिष्ट धर्माच्या लोकांना एजूट होऊन व्होट करा, असे सांगितले जात आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेसवर हल्ला चढवला. ते मध्यप्रदेशातील खरगोन येथे एका प्रचारसभेला संबोधित करत होते.
मोदी म्हणाले, 'विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीतील सहकाऱ्यांना लोकांच्या भवितव्याची चिंता नाही, ते आपले कुटुंब वाचवण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधताना मोदी म्हणाले, आपण विरोधकांचा अजेंडा उघड करताच, विरोधकांनी आपल्या विरोधात 'अपशब्दांचा शब्दकोश' रिकामा केला.
मोदी पुढे म्हणाले, 'आपल्या एका मताने भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनले, कलम 370 (जे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते.) हटवले. एका आदिवासी महिलेला देशाचे राष्ट्रपती बनवले आणि आपल्या एका मताने भारतातील 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे."
''आपल्या मताने अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर बांधून 500 वर्षांची प्रतीक्षा संपवली. आपल्या प्रयत्नाने देश पुढे चालला आहे, असेही मोदी म्हणाले.