"दिग्विजय सिंह आणि जयवर्धन सिंह यांचे कपडे फाडा..."; कमलनाथ यांचा 'तो' Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 12:04 PM2023-10-17T12:04:43+5:302023-10-17T12:06:14+5:30
भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांचे तिकीट शेवटच्या क्षणी रद्द केल्याने वादाला तोंड फुटलं आहे
मध्य प्रदेशातकाँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी आणि निषेध करण्यात येत आहे. भाजपा सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले कोलारसचे आमदार वीरेंद्र रघुवंशी यांचे तिकीट शेवटच्या क्षणी रद्द केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. असंतुष्ट कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांची भेट घेऊन पक्षाच्या निर्णयाला विरोध दर्शवला. यावेळी कमलनाथ यांनी काँग्रेस नेते रघुवंशी यांच्या समर्थकांना सडेतोड उत्तर दिलं.
भोपाळमध्ये माजी मुख्यमंत्री कमलनाथ शिवपुरी जिल्ह्यातून आलेल्या लोकांना म्हणाले, तुम्ही लोक इथे बंड करू नका. दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांच्याकडे जा आणि त्यांचे कपडे फाडा. याचा अर्थ, व्हिडिओमध्ये कमलनाथ वीरेंद्र रघुवंशी समर्थकांना सांगत आहेत की, त्यांनी आता दिग्विजय सिंह आणि त्यांचे आमदार पुत्र जयवर्धन सिंह यांच्याशी याबाबत बोला. भाजपाने आता या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
"आप जाकर दिग्विजय सिंह और जयवर्धन के कपड़े फाड़िए..."
— Gaurav Bhatia गौरव भाटिया 🇮🇳 (@gauravbhatiabjp) October 17, 2023
यह हैं कपटनाथ किसके साथ कपट कर दें कुछ नहीं पता
कांग्रेस ऐसे ही कपटी पार्टी नहीं कहलाती#MadhyaPradeshElection2023pic.twitter.com/oNNsQutqdy
मध्य प्रदेश भाजपाचे मीडिया प्रभारी आशीष अग्रवाल यांनी निशाणा साधला आहे. ""दिग्विजय सिंह आणि जयवर्धनचे कपडे फाडून टाका..." अहो कमलनाथ जी, तुम्ही कपडे फाडायला तयार झालात. बरं, अख्खी काँग्रेस फाटली असताना तुम्ही काय करू शकता? दिग्विजय सिंह जी, शिवपुरीहून आलेल्या वीरेंद्र रघुवंशी यांच्या समर्थकांमध्ये कमलनाथजींसोबत झालेल्या संभाषणाचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला आणि तुमच्या मुलाला नक्कीच वेदना जाणवतील आणि बदलाही घ्याल. आता कोण कोणाचे कपडे फाडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे." असं म्हटलं आहे.
भाजपाच्या आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांनीही व्हिडीओ शेअर केला आणि लिहिलं, "तिकीट मागणाऱ्यांना कमलनाथांचा सल्ला: जा आणि दिग्विजय सिंह आणि जयवर्धन यांचे कपडे फाडा... राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंत काँग्रेसमध्ये अंतर्गत भांडण सुरू आहे. जनतेचं यात नुकसान होतं. यांना सत्तेपासून दूर ठेवणं हाच उपाय आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.