राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार; संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 12:56 PM2024-09-16T12:56:02+5:302024-09-16T12:56:38+5:30

Sanjay Gaikwad Statement on Rahul Gandhi: गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

11 lakh reward for who will cutting off Rahul Gandhi's tongue; Controversial statement of Sanjay Gaikwad, Eknath Shinde Shivsena MLA | राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार; संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार; संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य

राहुल गांधी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान करत राहुल गांधी यांची जीभ छाटून आणून देणाऱ्यास 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा येथील त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर खळबळजनक वक्तव्य केले. काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते ते बाहेर आले आहे. बाबासाहेबांनी जातींना रिझर्व्हेशन दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा हे रिझर्व्हेशन रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला. काँग्रेसने निवडणुकीत मत मागितले. आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. जो कापेल त्याला मी ११ लाख रुपये देणार, असे गायकवाड म्हणाले. 

प्रत्येकाला पक्ष फोडायचा असतो, ऑफर देतात. मलाही ऑफर दिली जाते. राजकारणाचे हे खेळ असतात, मला कुठलीही आलेली ऑफर मी धुडकावणार आहे, असेही गायकवाड म्हणाले.

महाराष्ट्रात आणि देशात आरक्षणाच्या मागणीची आग लागलेली आहे. आंबेडकरांनी संविधानात एससी, एसटी, ओबीसी यांना समाजात ताठ मानेने जगण्यासाठी आरक्षण दिले. काँग्रेसचे नेते विदेशात जाऊन माझ्या देशातले रिझर्व्हेशन संपवायचे आहे, असे वक्तव्य केले. पोटातली मळमळ त्यांनी ओकून दाखविली. लोकसभेला फेक नरेटिव्ह ठेवून लोकांची मते घेतली, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

Web Title: 11 lakh reward for who will cutting off Rahul Gandhi's tongue; Controversial statement of Sanjay Gaikwad, Eknath Shinde Shivsena MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.