“जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:03 PM2023-08-08T18:03:10+5:302023-08-08T18:04:00+5:30

7 Questions Prakash Ambedkar to Rahul Gandhi: अनेक मुद्द्यांवरून प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधींवर थेटपणे प्रश्नांची सरबत्ती केल्याचे पाहायला मिळत आहे.

7 questions asked prakash ambedkar to rahul gandhi on various topics and criticised opposition alliance india | “जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले

“जवाब देना होगा!”; प्रकाश आंबेडकरांचे राहुल गांधींना ७ प्रश्न, INDIA आघाडीवरही बरसले

googlenewsNext

7 Questions Prakash Ambedkar to Rahul Gandhi: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यानंतर आता राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. तसेच राहुल गांधी यांना त्यांचे निवासस्थानही देण्यात आले आहे. यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांना सात प्रश्न विचारले असून, याचे उत्तर दिले पाहिजे, असे म्हटले आहे. 

प्रकाश आंबेडकर यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये एका खालोखाल एक ७ प्रश्न विचारले आहेत. तसेच राहुल गांधी तुम्ही गप्प राहिलात. मात्र, संपूर्ण काँग्रेस पक्ष तसेच विरोधी पक्षांची इंडिया आघाडी शांत कशी राहिली, अशी विचारणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. मणिपूर हिंसाचार, नूंह हिंसाचार, दिल्ली सेवा विधेयक यासह अनेक मुद्द्यांवरून प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींवर थेटपणे प्रश्नांची सरबत्ती केल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना नेमके कोणते ७ प्रश्न विचारलेत?

१.  मणिपूर हिंसाचार आणि नूंह हिसाचार या दोन्हींबाबत तुमची प्रतिक्रिया अत्यंत उशिरा आणि राजकीय अचूकतेची अनुभूती देणारी होती. दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी यांच्या खर्‍या प्रश्नांवर काँग्रेस आणि त्यांचे सहयोगी घटक पक्ष कधी बोलणार?

२. फूड डिलिव्हरी अॅपवरून ऑर्डर देण्यापेक्षा वेगाने लोकसभेमध्ये सरकारने मंजूर केलेल्या डेटा प्रोटेक्शन विधेयकाच्या चर्चेत तुम्ही भाग का घेतला नाही?

३. जे थेट एका विशिष्ट उत्पादन उद्योगाला मदत करते, ज्यांचे शेअर्स बंदीनंतर वाढले आहेत? लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याच्या धोरणावर कॉँग्रेस सरकारला कधी कोंडीत पकडणार आहे? भारतातील भ्रष्टाचाराबाबत निवडणूक रोख्यांबाबत तुमची भूमिका काय आहे?

४. मणिपूर हिंसाचारावर तुमची आघाडी खरा प्रश्न कधी विचारणार आहे? तेथील एका हिंदू समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा का दिला गेला? कोणत्या पक्षाने ही प्रक्रिया सुरू केली? या निर्णयावर आघाडीची काय भूमिका आहे?

५. मैला वाहून नेण्याची प्रथा संपुष्टात आली आहे, याचा दोन्ही सभागृहात वारंवार पुनरुच्चार करून सांगण्यात आलेल्या सरकारच्या आकडेवारीशी आणि उत्तराशी तुम्ही सहमत आहात का?

६. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपयोजना निधी हमी योजनांसाठी वळवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचे तुम्ही स्पष्टीकरण कसे द्याल?

७. माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे नियमितपणे हिंदु राष्ट्राची मागणी करणाऱ्या बागेश्वर बाबाचा पाहुणचार करत असतील तर काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी कशी आहे?


 

Web Title: 7 questions asked prakash ambedkar to rahul gandhi on various topics and criticised opposition alliance india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.