Assembly Election Result 2021: “बंगालमधील पराभवामुळे चंद्रकांत पाटील डिस्टर्ब, टीका सहन करण्याचीही ताकद हवी”
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 07:27 PM2021-05-03T19:27:09+5:302021-05-03T19:29:06+5:30
Assembly Election Result 2021: भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला आता प्रत्युत्तर दिले जात आहे.
मुंबई: देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरवत बंगाली जनतेने तृणमूल काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिला. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला आता प्रत्युत्तर दिले जात आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. (assembly election result 2021 vijay wadettiwar criticised bjp chandrakant patil over election results)
बंगाल निवडणुकीतील पराभवानंतर चंद्रकांत पाटील डिस्टर्ब झाले आहेत. टीका करण्याची आवड असेल, तर टीका सहन करण्याचीही ताकद असायला हवी, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. निवडणुकांचे योग्य नियोजन केले असते, तर कोरोना वाढला नसता, असा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी बोलताना केला.
ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; तृणमूलच्या बैठकीत निर्णय
केंद्र सरकारचे लसीकरणाचे नियोजन बिघडले
सामुहिक जबाबदारीने संकटावर मात करण्याची तयारी न दाखवता फक्त घोषणा केली जाते. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला मोठी चपराक दिली आहे. केंद्र सरकारचे लसीकरणाचे नियोजन बिघडले आहे. अदर पुनावाला प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
कौतुस्कास्पद! कॅफेटेरिया बनलं कोरोना केअर सेंटर; Tech Mahindra चा पुढाकार
निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी बिकट स्थिती
देशभरातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुका घेतल्या. निवडणुका जिंकण्याच्या हव्यासापोटी देशात बिकट स्थिती निर्माण झाली. महाराष्ट्राने आकडे लपवले नाहीत. अन्य राज्यांनी ते लपवले, असा दावाही वडेट्टीवार यांनी यावेळी केला. केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला किती मानते, हे पाहावे लागेल. लाखोंच्या घरात रुग्णसंख्या जात आहे. मात्र, तरीही लॉकडाऊन का घोषित केला जात नाही, अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर
दरम्यान, छगन भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात. निर्दोष सुटलेले नाहीत. फार बोलू नका. नाही तर महागात पडेल, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर, तुम्ही सांगाल ते करायला न्यायदेवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही, असे प्रत्युत्तर छगन भुजबळांनी दिले.