Maharashtra Politics: “राहुल गांधींना लग्न करायला सांगा, नंतर बायको मिळणार नाही! भारत जोडो आधी घर जोडो हाती घ्या”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 01:48 PM2022-10-07T13:48:34+5:302022-10-07T13:49:45+5:30
राहुल गांधींना बायकोचा अनुभव आला पाहिजे. त्यांच्याप्रमाणे बेरोजगार असून, आई-वडील मला सांभाळतात; बाळासाहेब थोरातांना फोन केलेल्या तरुणाची ऑडिओ क्लिप व्हायरल.
Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनीही भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून, उत्साह शिगेला पोहोचला होता. यातच आता औरंगाबाद येथील एका व्यक्तीना काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना फोन करून राहुल गांधी यांच्या विवाहाबाबत चिंता व्यक्त केली. थोरात आणि युवकामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश पाटील असे या व्यक्तीचे नाव असल्याचे म्हटले जात आहे. रमेश पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना फोन केला, तेव्हा सुरुवातीला आपल्याला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा उपक्रम आवडल्याचे सांगितले. सामान्य लोकांना भारत जोडो यात्रा आवडत आहे. त्यानंतर रमेश पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यापाशी राहुल गांधी यांच्या लग्नाचा मुद्दा काढला. माझा विषय आहे की, राहुल गांधी साहेबांचे लग्न झाले पाहिजे. भारत जोडो ऐवेजी त्यांनी पहिले घर जोडो अभियान हाती घेतले पाहिजे, असे ते म्हणाल्याचे ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
राहुल गांधींना बायकोचा अनुभव आला पाहिजे ना, समजले पाहिजे
राहुल गांधी यांनी कोणत्याही समाजाची बायको करावी, पण आता त्यांनी लग्न करावे. त्यांनाही बायकोचा अनुभव आला पाहिजे ना, बायको कशी असते त्यांनाही समजले पाहिजे. तसेच मीदेखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे बेरोजगार असल्याचे पाटील यांनी म्हटले. माझे आईवडील मला सांभाळतात. राहुल गांधी बेरोजगार आहेत, तसा मीपण बेरोजगार आहे. मला पक्षाशी काहीही देणेघेणे नाही. पण किमान यावर्षी तरी राहुल गांधी यांचे लग्न होईल का, असा सवाल पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना विचारला. राहुल गांधी आता ५० वर्षांचे आहेत. नंतर त्यांना बायकोही मिळणार नाही, असे पाटील यांनी थोरातांना सांगितले. बाळासाहेब थोरात आणि औरंगाबादमधील या व्यक्तीची ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, कर्नाटकात लवकरच निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही पदयात्रेत भाग घेतला. ७५ वर्षीय सोनिया गांधी आणि राहुल गांधी सोबत चालतानाची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. राहुल गांधी यांची ही यात्रा आणखी १५ दिवस कर्नाटकात राहणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"