राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला: RSS स्वयंसेवकाला १ हजार रुपयांचा दंड; कोर्टाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 06:02 PM2022-04-22T18:02:55+5:302022-04-22T18:03:42+5:30

यापूर्वीही कोर्टाने राजेश कुंटे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, हा दंड अद्याप भरलेला नाही.

bhiwandi court directs rss leader rajesh kunte to pay 1000 fine congress rahul gandhi defamation case | राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला: RSS स्वयंसेवकाला १ हजार रुपयांचा दंड; कोर्टाचा आदेश

राहुल गांधींविरोधात बदनामीचा खटला: RSS स्वयंसेवकाला १ हजार रुपयांचा दंड; कोर्टाचा आदेश

Next

भिवंडी: काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याप्रकरणी भिवंडी न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांना १ हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे. तसेच मूळ खटला स्थगित करण्यासंदर्भात केलेली याचिका फेटाळत मूळ खटला सुरूच राहणार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे. 

सन २०१४ मध्ये एका सभेत बोलताना राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा मोठा आरोप केला होता. राहुल यांच्या या विधानामुळे संघाची बदनामी झाल्याचे सांगत राजेश कुंटे यांनी भिवंडी कोर्टात खटला दाखल केला होता. राहुल गांधी याआधीच कोर्टात हजेरी लावत गुन्हा कबूल नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर २०१८ मध्ये कोर्टाने त्यांच्याविरोधात आरोप निश्चित केले. 

हा खटला स्थगित करावा अशी विनंती

या आधीदेखील कुंटे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, हा दंड त्यांनी अद्याप भरला नाही. याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी हा खटला स्थगित करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आणि एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे की, मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाविरोधात त्यांची एक रिट याचिका मुंबई हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे हा खटला स्थगित करावा अशी विनंती केली. 

दरम्यान, या प्रकरणातील एका साक्षीदाराला कोर्टात हजर करू इच्छितो, अशी विनंती कुंटे यांनी कोर्टाला केली होती. मात्र, काही कारणास्तव कोर्टाने याला परवानगी दिली नाही. त्यानंतर मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या या निर्णयाविरोधात  कुंटे यांनी हायकोर्टात धाव घेतली. याचिकाकर्त्यांनी भिवंडीतील निजामपूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोर्टात हजर करण्याची परवानगी मागितली होती. या पोलिसाने राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी संबंधित फाइल तयार केली होती. मात्र, राहुल गांधी यांच्या वकिलाने याला विरोध केला. 
 

Web Title: bhiwandi court directs rss leader rajesh kunte to pay 1000 fine congress rahul gandhi defamation case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.