पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव; अतुल भातखळकरांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:04 PM2021-04-27T21:04:05+5:302021-04-27T21:14:14+5:30
एका कंपनीनं प्रदर्शित केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत घातला होता गोंधळ.
पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत असं म्हणत भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला. STORIA या कंपनीनं एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीवरून मोठं वादंग निर्माण झालं. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी या कंपनीच्या कार्यालयात शिरून गोंधळ घातला होता. त्यानंतर भाई जगताप यांनी "सोनिया गांधी राहुल गांधी यां STORIA कंपनीने जाहिराती मधून केलेल्या बदनामीला चोख उत्तर दिल्याबद्दल मुंबई काँग्रेस सरचिटणीस नितीन सावंत तसेच युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक. असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी," असा इशारा देत व्हिडीओही शेअर केला होता.
"पंतप्रधान मोदींना चहावाला, मौत का सौदागर, शेठ अशी वाट्टेल ती विशेषणे लावणारे काँग्रेसचे फाजील नेते एका पप्पूमय जाहिरातीमुळे बिथरले. सत्ता आहे म्हणून ही मस्ती चालली आहे. तोडफोड करणाऱ्या या गुंडांच्या टोळीला लॉकडाऊनच्या नियमातून उद्धवजीनी विशेष सूट दिलेली दिसते," असं म्हणत भातखळकर यांनी यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर टीका केली.
आलू से सोनाच्या धर्तीवर... यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा, अशी जाहिरात केल्यामुळे खवळलेल्या काँग्रेसवाल्यानी कंपनीचे कार्यालय फोडले.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 27, 2021
संताप योग्यच आहे त्यांचा. कॉपीराईट वगैरे काही प्रकार आहे की नाही? पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत. pic.twitter.com/m1bNztKuKY
पंतप्रधान मोदींना चहावाला, मौत का सौदागर, शेठ अशी वाट्टेल ती हलकट विशेषणे लावणारे काँग्रेसचे फाजील नेते एका पप्पूमय जाहिरातीमुळे बिथरले. सत्ता आहे म्हणून ही मस्ती चालली आहे. तोडफोड करणाऱ्या या गुंडांच्या टोळीला लॉकडाउन च्या नियमातून उद्धवजीनी विशेष सूट दिलेली दिसते. https://t.co/p80vzeLq0h
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 27, 2021
"आलू से सोनाच्या धर्तीवर... यहा से घास डालुंगा वहा से दूध निकलेगा, अशी जाहिरात केल्यामुळे खवळलेल्या काँग्रेसवाल्यानी कंपनीचे कार्यालय फोडले. संताप योग्यच आहे त्यांचा. कॉपीराईट वगैरे काही प्रकार आहे की नाही? पप्पू आणि पप्पूगिरीच्या पेटंटचे सर्व हक्क काँग्रेसकडे राखीव आहेत," असं म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला लगावला.