Maharashtra Politics: “दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 06:01 PM2022-11-16T18:01:29+5:302022-11-16T18:02:26+5:30

Maharashtra News: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असून, पुन्हा एकदा भाजपने यावरून टीका केली आहे.

bjp leader mla atul bhatkhalkar criticized rahul gandhi bharat jodo yatra over congress tamilnadu incident | Maharashtra Politics: “दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत”

Maharashtra Politics: “दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत”

Next

Maharashtra Politics: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला महाराष्ट्रातूनही मोठा पाठिंबा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. हळूहळू ही यात्रा पुढे जात असून, विविध सभांमधून राहुल गांधी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या धोरणांवर सडकून टीका करताना दिसत आहे. यातच भाजपकडून पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेवर निशाणा साधण्यात आला आहे. काँग्रेस जोडता येत नाही आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत, असा टोला राहुल गांधींना लगावण्यात आला आहे. 

तामिळनाडूतून निघालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेनंतर मतदारसंघात पक्षाचा झेंडा फडकवण्याची चर्चा होती. यादरम्यान हाणामारीचे प्रकरण समोर आले आहे. टीएनसीसीचे खजिनदार आणि नांगुनेरीचे आमदार रुबी आर मनोहरन यांच्या समर्थकांमध्ये ही हिंसक हाणामारी झाली. टीएनसीसी मुख्यालय सत्यमूर्ती भवन येथे झालेल्या हाणामारीत पक्षाचे किमान चार कार्यकर्ते जखमी झाले आहेत. याच घटनेचा दाखला देत भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवर हल्लाबोल केला आहे. 

...आणि अभंग भारत जोडायला निघाले आहेत

अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये बातमी तामिळनाडू मधली आहे पण काँग्रेसच्या "भारत जोडो" यात्रेचे पितळ उघडे पाडणारी आहे... तिथे दुभंगलेली काँग्रेस जोडता येत नाही आणि इथे अभंग भारत जोडायला निघाले आहेत, असा टोला अतुल भातखळकर यांनी राहुल गांधींना लगावला आहे. 

दरम्यान, भारत जोडो यात्रेत महागाई, बेरोजगारीसह अर्थव्यवस्थेचा प्रश्नही महत्वाचा मुद्दा आहे. अर्थव्यवस्थेची घसरगुंडी मोदी सरकारला थांबवता येत नाही, जनता महागाईने त्रस्त आहे पण पंतप्रधान मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावर गप्प आहेत. अर्थव्यवस्थेची स्थिती नाजूक आहे. पण सरकार ते मान्यच करत नाही. दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याच्या वल्गना करणारे आता ७५ हजार नोकऱ्या देत आहेत, ही तरुणांची फसवणूक आहे, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bjp leader mla atul bhatkhalkar criticized rahul gandhi bharat jodo yatra over congress tamilnadu incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.