Maharashtra Politics: “मोदी सरकारमध्ये उद्योगपतींचे कर्ज २ मिनिटांत माफ, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 08:39 PM2022-11-14T20:39:54+5:302022-11-14T20:40:44+5:30

Maharashtra News: भाजप व आरएसएस देशभरात भीतीचे वातावरण तयार करत असून, जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

congress leader mp rahul gandhi criticized pm modi govt over farmers loan waiver in bharat jodo yatra at hingoli | Maharashtra Politics: “मोदी सरकारमध्ये उद्योगपतींचे कर्ज २ मिनिटांत माफ, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही”: राहुल गांधी

Maharashtra Politics: “मोदी सरकारमध्ये उद्योगपतींचे कर्ज २ मिनिटांत माफ, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही”: राहुल गांधी

Next

Maharashtra Politics: केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेमध्ये द्वेष, हिंसा ,भीती पसरवत असून त्याच्या  विरोधात ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. भाजप व आरएसएस देशभरात  भीतीचे वातावरण बनवत आहेत. जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. शेतकरी पहाटे ४ वाजता कामाला सुरुवात करतो, घाम गाळतो पण शेतमालाला भाव मिळत नाहीत. पीकविम्यासाठी खाजगी कंपन्यांना हप्ता भरतात. चक्रीवादळ, पाऊस, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान होते पण नुकसाई भरपाई मिळत नाही. मोदी सरकार देशातील उद्योगपतींचे कर्ज दोन मिनिटांत माफ करतात पण शेतक-याला कर्जमाफी देत नाहीत, असा घणाघाती हल्लाबोल खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.

हिंगोली जिल्ह्यातील काळेगाव येथे पदयात्रेची चौक सभेत हजारो लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा, आरएसएस, मोदी सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते म्हणाले की, भाजपच्या राज्यात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती कमी होत नाहीत. यातून मिळालेला पैसा दोन चार उद्योगपतींच्या खिशात जातो. छोटे व्यापारी यांचे नुकसान  झाले, हा व्यवसायच बंद करून दोन चार उद्योगपतींची एकाधिकारशाही आणण्याचा मोदींचा मनसुबा आहे. हे सरकार 'हम दो हमारे दो' चे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हणताच जनतेतून याला प्रतिसाद देत, 'दो सरकार में, दो बाजार में', असा आवाज उमटला.

गरिबांना मोदींच्या राज्यात स्थान राहिलेले नाही

चीनमधून वस्तू आयात केल्या जातात यातून चीनचा फायदा होतो आणि हे माल विकणारे काही उद्योगपती गडगंज होत आहेत. हे मोबाइल व इतर वस्तू 'मेड इन चीन, नाही तर मेड इन हिंगोली' अशा झाल्या पाहिजेत. मोदी सरकार हिंसा, धर्म, जात यामध्ये जनतेला गुंतवून ठेवत आहे, मुख्य मुद्द्यांची चर्चाच होऊ दिली जात नाही. शिक्षण, आरोग्य सर्व काही खाजगी केले, सामान्य जनतेला हे परवडणारे नाही. तुम्ही शिक्षण, आरोग्यासाठी आवाज उठवला पाहिजे. गरिबांना मोदींच्या राज्यात स्थान राहिलेले नाही.  सार्वजनिक क्षेत्रातील रेल्वे, बँक, शिक्षण, हॉस्पिटल सर्व काही खाजगी उद्योगपतींच्या खिशात घातले आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

दरम्यान, लष्कर, बीएसएफ, सीआरपीएफ, मधले तरुण देशासाठी मरण्यास तयार असतात पण येथेही मोदींनी अग्निपथ योजना आणली. जवानांना उत्तम प्रशिक्षण दिले पाहिजे पण मोदी सरकार फक्त सहा महिन्यांचे प्रशिक्षण देत आहे, हे जवान आव्हानाला कसे सामोरे जाणार ? जवानांना सेवेनंतर गावात सन्मान मिळत होता. १५-२० वर्ष देशासाठी दिल्यामुळे हा सन्मान मिळत असे पण अग्निपथमुळे सैन्यच कमजोर होईल. आता त्यांना या सेवेतही स्थैर्य नाही, चार वर्षानंतर घरी जा, अशी ही योजना आहे, यातून बेरोजगारी वाढवण्याचे काम होणार आहे. असे राहुल गांधी म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

Web Title: congress leader mp rahul gandhi criticized pm modi govt over farmers loan waiver in bharat jodo yatra at hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.