आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सुचनांवरून : राहुल गांधींचा आग्रह 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 11:38 AM2019-02-02T11:38:27+5:302019-02-02T11:43:05+5:30

लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात येत असून त्यात जनतेकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत.

Congress manifesto for upcoming elections create from People's suggestions: Rahul Gandhi's insistence | आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सुचनांवरून : राहुल गांधींचा आग्रह 

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा जाहीरनामा जनतेच्या सुचनांवरून : राहुल गांधींचा आग्रह 

Next
ठळक मुद्देविधानसभेसाठीही जाहीरनामा करणारत्याचबरोबर कृषी, उद्योग, सामाजिक, सामाजिक न्याय, नागरी प्रश्न यासाठी उपसमित्या नियुक्त

पुणे: लोकसभा व विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा तयार करण्यात येत असून त्यात जनतेकडून सुचना मागवण्यात आल्या आहेत. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचा जनतेच्या सुचनांबाबत आग्रह असून त्यासाठी प्रत्येक राज्यातील समितीने संकेतस्थळ जाहीर करून त्यावर सुचना मागवाव्यात असे कळवण्यात आले आहे. 
पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बुधवारी बैठक झाली. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या तीन सदस्यांबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, आमदार अनंत गाडगीळ व समितीचे अन्य सदस्य यावेळी उपस्थित होते. त्यात लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जाहीरनामा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. राहूल यांच्या आग्रहानुसार www.fifesto2019@coZ  हे संकेतस्थळ जाहीर करण्यात आले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय असावे यासंबधी नागरिकांनी या संकेतस्थळावर आपल्या सुचना द्याव्यात असे आवाहन करण्यात आले.
त्याचबरोबर कृषी, उद्योग, सामाजिक, सामाजिक न्याय, नागरी प्रश्न यासाठी उपसमित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या प्रश्नांचा अभ्यास करून उपसमित्यांनी त्याचा अहवाल समितीला सादर करायचा आहे. केंद्रांशी संबधित असलेल्या सुचना काँग्रेस महासमितीकडे दिल्लीत पाठवण्यात येतील व राज्याची संबधित सुचनांचा विधानसभेसाठीच्या जाहीरनाम्यात समावेश केला जाईल अशी माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली. 

Web Title: Congress manifesto for upcoming elections create from People's suggestions: Rahul Gandhi's insistence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.