“देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, पक्षातून लोक जात असल्याच्या भाजपकडून अफवा”: नाना पटोले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 04:34 PM2023-08-28T16:34:06+5:302023-08-28T16:45:40+5:30

भाजप लिहून देते, तसे अजित पवारांना बोलावे लागणार कारण...; नाना पटोलेंची टीका

congress nana patole criticised bjp and ncp ajit pawar group | “देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, पक्षातून लोक जात असल्याच्या भाजपकडून अफवा”: नाना पटोले

“देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, पक्षातून लोक जात असल्याच्या भाजपकडून अफवा”: नाना पटोले

googlenewsNext

Nana Patole News: राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून एकमागून एक सभा घेतल्या जात असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी आणि सत्ताधारी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहे. संजय राऊतांनी अजित पवार गटावर केलेल्या टीकेनंतर आता काँग्रेसकडून भाजप आणि अजित पवार गटावर निशाणा साधण्यात आला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मीडियाशी बोलताना देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचा दावा केला आहे. दिल्ली-द्वारका महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. देशातील अनेक महामार्गांची कामे झाले असून, त्याच किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल? त्यामुळे सतत काँग्रेसवर टीका केली जाते. पण, जेवढी टीका करतील, तेवढा फायदा काँग्रेसला होणार आहे. देशात काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे लोकांना कळले आहे, असे नाना पटोलेंनी म्हटले आहे. 

भाजप लिहून देते, तसे अजित पवारांना बोलावे लागणार

भाजप लिहून देते, तसे अजित पवारांना बोलावे लागणार. शरद पवार सांगतात की, ईडीमुळे हे लोक सरकारबरोबर गेले आहेत. हे बोलले नाहीतर, ईडी आपल्यावर कारवाई करेल. म्हणून भाजपने लिहून दिल्यानुसार अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना बोलावे लागते, अशी टीका नाना पटोले यांनी केली. तसेच लहान कार्यकर्त्यांचा हा प्रश्न होता. मुंबई विभागीय अध्यक्षांबरोबर माझी चर्चा झाली नाही. काँग्रेसमधून लोक बाहेर जातात, ही भाजपकडून अफवा पसरवली जाते. असे काहीही होणार नाही, असा दावा नाना पटोलेंनी केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे असो की अजितदादा असो ते भाजपच्या लिखित अजेंड्यावर काम करत आहेत. त्यांच्या तोंडी वाक्य टाकली जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही बोलायचे असेल तर त्यांना लिहून दिले जाते. शरद पवार यांच्या विरोधात काही बोलायचे असेल, लिहायचे असेल तर तेही त्यांना लिहून दिले जाते, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.


 

Web Title: congress nana patole criticised bjp and ncp ajit pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.