Maharashtra Politics: “...म्हणून काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे, राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत!”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 05:54 PM2022-11-15T17:54:43+5:302022-11-15T17:55:49+5:30

Maharashtra News: भारत जोडो यात्रा का काढण्यात आली, याचे कारण काँग्रेसकडून अधोरेखित करण्यात आले आहे.

congress nana patole said rahul gandhi should to be the prime minister of country | Maharashtra Politics: “...म्हणून काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे, राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत!”

Maharashtra Politics: “...म्हणून काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे, राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत!”

googlenewsNext

Maharashtra Politics: भगवान बिरसा मुंडा हे जुलमी ब्रिटिश सत्तेविरोधात लढले आज आपल्याला जुलमी भाजपा सरकारच्या विरोधात लढायचे आहे. वनवासी म्हणून भाजपा आदिवासी बांधवांचा अपमान करत आहे. आदिवासी बांधवांचे हक्क काँग्रेसच देऊ शकते त्यासाठी काँग्रेसचे सरकार आले पाहिजे व राहुल गांधी (Rahul Gandhi) पंतप्रधान झाले पाहिजेत देशाचे संविधान, तिरंगा सहीसलामत रहावा यासाठीच राहुल गांधी यांनीभारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढली आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील आदिवासींच्या कार्यक्रमात काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही सहभाग नोंदवला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असून, ती वाशिम जिल्ह्यात आली आहे. आदिवासी समाजाच्या न्याय, हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढले व वयाच्या २४ वर्षी शहिद झाले. ब्रिटिशांच्या बलाढ्य सत्तेसमोर ते झुकले नाहीत. हजारो वर्षापूर्वी देशात जंगल मोठ्या प्रमाणात होते आज ते नष्ट होत आहे पण जंगलाचे रक्षण आदिवासी बांधवांनीच केले. आदिवासी बांधवच या देशाचे मुळ निवासी व मालक आहेत, असे खासदार राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

आदिवासींच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस सदैव कटिबद्ध

देशाच्या जमिनीवर पहिला हक्क आदिवासी बांधवांचा आहे. ही जमीन तुमची आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजप तुम्हाला आदिवासी मानत नाही वनवासी म्हणते, भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांवर हे आक्रमण करत आहेत. वनवासी संबोधून तुमचे हक्क हिरावून घेतले जात आहेत. पण काँग्रेस पक्ष सदैव आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. काँग्रेस सरकारने आदिवासींच्या हक्कासाठी निर्णय घेतले. भाजप संविधानच मानत नाही त्यामुळे आदिवासी, दलित, वंचित, अल्पसंख्याक समाजाला त्यांचे हक्क मिळू नयेत अशी भाजपची भूमिका आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress nana patole said rahul gandhi should to be the prime minister of country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.