Maharashtra Politics: “मोदीजी, सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले?”: राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:46 PM2022-11-15T20:46:40+5:302022-11-15T20:47:47+5:30

Maharashtra News: महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. नोकऱ्यांच्या आश्वासनासंदर्भात मोदी गप्प आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

congress rahul gandhi slams modi govt over inflation unemployment in bharat jodo yatra in washim | Maharashtra Politics: “मोदीजी, सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले?”: राहुल गांधी

Maharashtra Politics: “मोदीजी, सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले?”: राहुल गांधी

googlenewsNext

Maharashtra Politics: नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देशातील तरुणांनी देऊन त्यांची फसवणूक केली. मोदी सत्तेत येऊन ८ वर्षे झाली नोकऱ्या तर दिल्या नाहीत. उलट चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून व नोटबंदीने व्यापार उद्योग बंद पाडून करोडो लोकांचे रोजगार घालवले. देशातील तरुणांचे स्वप्न भंग केले, देशातील तरुण मोदींना नोकऱ्या कुठे आहेत? असा सवाल विचारत आहेत पण मोदी गप्प आहेत असा हल्लाबोल खासदर राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विचारला.

वाशिमच्या चौक सभेला जमलेल्या हजारोंच्या  जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप व मोदी सरकारवर तुफान टीका केली. ते म्हणाले की, देशाचा कणा असलेला लघु, मध्यम, छोटे व्यापार दुकानदार यांचे व्यवसाय बंद पडले, लाखो रोजगार गेले. दोन तीन उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करत आहे. सामान्य जनतेसाठी नाही. महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. गॅस ४०० रुपये, पेट्रोल ७० रुपये व डिझेल ६० रुपये असताना नरेंद्र मोदी युपीए सरकारवर कठोर टीका करत होते. आता गॅस १२०० रुपये, पेट्रोल १०९ रुपये व डिझेल ९६ रुपये झाले तरी नरेंद्र मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत. सामान्य जनता , शेतकरी, कष्टकरी यांचे मोदी सरकारला काहीही देणेघेणे नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. 

मोदी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही

युपीए सरकारने शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले पण मोदी सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही. बड्या उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्ज एनपीएच्या नावाखाली मात्र माफ केली जातात आणि शेतकऱ्यांना लाख दोन लाख कर्जासाठी त्रास दिला जातो. शेतमालाला एमएसपी मिळत नाही. तरुण शिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्न पाहत आहे पण त्यांना नोकरी मिळत नाही. देशात हिंसा, द्वेष पसरवून समाजा-समाजात, जाती धर्मात भांडणे लावली जात आहेत. हा देश एकसंध रहावा, संविधान वाचावे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी यासाठीच ही भारत जोडो यात्रा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: congress rahul gandhi slams modi govt over inflation unemployment in bharat jodo yatra in washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.