राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 04:00 AM2019-11-06T04:00:40+5:302019-11-06T04:01:35+5:30
काँग्रेस-राष्टÑवादीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले; हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, खते मोफत द्यावीत
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १२ दिवस झाले तरी भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रीपदाचे गुºहाळ सुरू आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यपालांनीच आता हस्तक्षेप करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
काँग्रेस, राष्टÑवादीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. अवकाळी पावसामुळे कापूस, भात, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भूईमुग, धान, कांद्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक विमा कंपन्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. कंपन्यांचे टोल फ्री क्रमांक बंद आहेत.
बँकाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आणि रब्बीची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी यावेळी राज्यपालांकडे करण्यात आली.
विरोधकांच्या या आहेत मागण्या :
। नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा. । शेतकऱ्यांचे पीक कर्ज व वीज बील माफ करा. । नुकसानग्रस्त शेतकºयांना प्रती हेक्टर ५० हजार रुपये द्या. । फळबागा आणि भाजीपाल्यासाठी नुकसान भरपाई म्हणून प्रती हेक्टर १ लाख रुपये द्या.। पशुधन व घरांची झालेली पडझड पाहता त्यांचे पंचनामे तत्काळ करा. । रब्बीच्या पेरणीसाठी शेतकºयांना बी बियाणे, खते मोफत द्या.