"स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत, उलट...", नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 04:16 PM2024-08-30T16:16:43+5:302024-08-30T16:17:47+5:30

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळ्याप्रकरणी शिवरायांची जाहीर माफी मागितली. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. 

"Despite insulting freedom fighter Savarkar, they don't apologize, on the contrary...", Narendra Modi's attack on Congress, Vadhvan Port in Maharashtra's Palgha | "स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत, उलट...", नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

"स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत, उलट...", नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

पालघर : केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना सिंधुदुर्गातील मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळ्याप्रकरणी शिवरायांची जाहीर माफी मागितली. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. 

गेल्या काही काळापासून या भूमीचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सतत अपमान केला जातो. मात्र, त्यांनी कधी माफी मागितली नाही. उलट ते न्यायालयात जातात, पण त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गामध्ये जे काही घडलं ते दुर्दैवी होतं. माझ्यासाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही आहे. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा महाराजा महापुरुष नाही आहेत. तर आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहेत. म्हणून मी आज माझे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांच्या चरणांवर मस्तक झुकवून माफी मागतो. 

याचबरोबर, आमच्यावर वेगळे संस्कार आहेत. आम्ही ते लोक नाही आहोत, जे या भारतमातेचे या भूमीवरील वीर सुपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अपशब्द बोलत असतात. त्यांचा अपमान करतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अपशब्द उच्चारूनही जे माफी मागायला तयार होत नाहीत. देशभक्तांच्या भावनांचा चुराडा करत आहेत. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करूनही ते माफी मागत नाहीत. उलट न्यायालयात जातात, पण त्यांना या गोष्टीचा पश्चात्ताप होत नाही. महाराष्ट्राची जनता आता त्यांच्या संस्कारांना ओळखत आहेत, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारचा महत्वकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. या प्रकल्पासाठी तब्बल ७६००० कोटी खर्च करण्यात येणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

देशातील सर्वात मोठे पोर्ट होणार
या बंदरासाठी ७६ हजार कोटींहून अधिक जास्त रक्कम खर्च केली जाणार आहे. हे देशातील सर्वात मोठं कंटेनर पोर्ट असणार आहे. देशच नाही तर जगातील सर्वात मोठे पोर्ट असणार आहे. आज देशातील सर्व कंटेनर पोर्टातून जेवढे कंटेनर येतील जातील, संपूर्ण देशातील मी सांगतो, त्याच्यापेक्षा जास्त कंटेनरचं काम एकट्या वाढवण बंदरात होणार आहे. तुम्ही अंदाज लावू शकता, हे पोर्ट महाराष्ट्र आणि देशाच्या व्यापाराचा औद्योगिक प्रगतीचे किती मोठे केंद्र होईल, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

Web Title: "Despite insulting freedom fighter Savarkar, they don't apologize, on the contrary...", Narendra Modi's attack on Congress, Vadhvan Port in Maharashtra's Palgha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.