पवार साहेबांना सोडू नका, उत्तर आम्हाला द्यावं लागतय; कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 11:47 AM2019-11-25T11:47:39+5:302019-11-25T11:52:13+5:30

कार्यकर्त्याच्या प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकूणच या प्रतिक्रियेमुळे धनंजय मुंडेंच्या या निर्णयावर किती राग व्यक्त करण्यात येतोय हे स्पष्ट झाले आहे. 

Don't leave Dhananjay Munde, we have to answer; The activist heard | पवार साहेबांना सोडू नका, उत्तर आम्हाला द्यावं लागतय; कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना सुनावले

पवार साहेबांना सोडू नका, उत्तर आम्हाला द्यावं लागतय; कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना सुनावले

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवारांच्या भूमिकेशी असहमत असलेल्या शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. या घडामोडीनंतर अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना सर्वसामान्यांमधून मोठा विरोध होत आहे. 

अजित पवार यांच्या शपथविधीच्या वेळी 11 आमदार उपस्थित होते. यामध्ये धनंजय मुंडे आघाडीवर होते. परंतु, सोबतचे जवळ-जवळ 9-10 आमदार हे शरद पवार यांच्याकडे परतले आहे. तर धनंजय मुंडे संपूर्ण दिवसभर नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते अजित पवारांसोबत आहेत अशी चर्चा रंगली होती. मात्र अखेर धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित झाले होते. 

दरम्यान धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या बंडात सामील असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षासोबत आणि शरद पवार यांच्यासोबतच असून कोणीही संभ्रम निर्माण करू नये, अशी पोस्ट ट्विटरवर शेअर केली होती. त्यावर लगेच प्रतिक्रिया सुरू झाल्या होत्या. एका कार्यकर्त्यांने ट्विटरवरच प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंना सुनावले. साहेब मी स्वत: तुम्हाला सात ते आठ कॉल केले. तुमचा फोन नॉट रिचेबल होता. तुम्ही पवार साहेबांची साथ सोडली तर मी आत्महत्या करेल, कारण जनतेला उत्तर तुम्हाला नव्हे तर आम्हाला द्यावे लागतात, असंही कार्यकर्त्याने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. 

कार्यकर्त्याच्या प्रतिक्रियेचा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकूणच या प्रतिक्रियेमुळे धनंजय मुंडेंच्या या निर्णयावर किती राग व्यक्त करण्यात येतोय हे स्पष्ट झाले आहे. 
 

Web Title: Don't leave Dhananjay Munde, we have to answer; The activist heard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.