मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली, रोजगार गेले; राहुल गांधींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 09:55 PM2019-04-15T21:55:10+5:302019-04-15T21:56:21+5:30
पाच वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार चालवत आहेत. त्यांनी जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स लावला. अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.
नांदेड - पाच वर्षापासून नरेंद्र मोदी सरकार चालवत आहेत. त्यांनी जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स लावला. अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर केली.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रचारसभा आज नांदेड येथे झाली. या सभेमध्ये राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या आर्थिक आणि शेतीविषयक धोरणांवर जोरदार टीका केली. ''मोदींनीगब्बरसिंग टॅक्स लावला. अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मोदींनी जीएसटी म्हणजेच गब्बरसिंग टॅक्स लावला. अर्थव्यवस्था कोलमडली. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली,''असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. दोन कोटी तरुणांना दरवर्षी रोजगार आणि शेतीला हमीभाव देण्याचा आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात फसवणूक झाली, अशी टीका राहुल गांधींनी केली.
यावेळी राफेल विमान करारावरूनही राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला. मोदींनी चौकीदारी कोणाची केली. शेतकऱ्याची केली नाही, अनिल अंबानीची केली. ३० हजार कोटी थेट अनिल अंबानीला फायदा झाला. राफेल प्रकरणी मी नरेंद्र मोदींना संसदेत प्रश्न विचारले. किंमत का वाढली, अंबानीलाच का काम दिले, एचएएल ला काम का दिले नाही. पण माझ्या एकाही प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले नाही. नरेंद्र मोदी संसदेत दीड तास बोलले, नेहरु, इंदिरा गांधी, सगळ्यावर बोलले पण राफेलवर काहीच बोलले नाहीत,'' असे राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधीच्या भाषणातील अन्य महत्त्वाचे मुद्दे
- श्रीमंतांचे पैसे माफ होऊ शकतात, अनिल अंबानीचे पैसे माफ होऊ शकतात तर तुमच्या खात्यात ७२ हजार का जमा होऊ शकत नाहीत
- नोटाबंदीच्या नावाखाली नरेंद्र मोदींनी फक्त तमाशा केला, काळा पैसा आणतो म्हणून. तुम्हाला एटीएमच्या रांगेत उभे केले
- २०१९ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे सरकार आल्यानंतर स्वतंत्र कृषी बजेट सादर केले जाईल
- कर्ज फेडू न शकलेल्या कोणत्याही शेतकऱ्याला जेलमध्ये जावे लागणार नाही. काँग्रेसचे सरकार येताच कायद्यात योग्य ते बदल केले जातील
- नरेंद्र मोदी माझ्याबरोबर आमने-सामने चर्चा करावी. राफेलसंदर्भात दोन तीन प्रश्न विचारतो. पण चौकीदार घाबरतो. भ्रष्टाचारावर चर्चा करु
- महाराष्ट्राचा डीएनए काँग्रेसचा आहे. काम कसे करावे याची दिशा महाराष्ट्र देशाला देतो