पाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 16:24 IST2020-02-28T16:01:59+5:302020-02-28T16:24:01+5:30
दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती.

पाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ
महाविकास आघाडी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांनी 5 दिवसाचा आठवडा करण्याची केलली मागणी मान्य केली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळावला होता. मात्र आता राज्य सरकारच्या पाच दिवसाच्या आठवड्याच्या निर्णयाला सोलपूरमधील महेश गाडेकर यांनी याचिका दाखल केली आहे.
राज्यसरकाच्या पाच दिवसाच्या आठवड्याच्या निर्णयला महेश गाडेकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकारने सवंग लोकप्रियतेसाठी नोकरदारांसाठी हा निर्णय घेतल्याचे महेश गाडेकर यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे महेश गाडेकर यांनी केलेल्या याचिकेची सुनावणी सोमवारी उच्च न्यायालयात होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार पाच दिवसांचा आठवडा करण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. त्यानुसार, दररोज कामाची ४५ मिनिटे वाढवून 5 दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय करता येईल, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत मांडली होती. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत 5 दिवसांचा आठवडा करण्यास मंजुरी देण्यात आली होती.
दरम्यान, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचाच आठवडा आहे. तर, देशातील 7 राज्यांमधील कर्मचाऱ्यांनाही 5 दिवसांचा आठवडा असून 2 दिवस सुट्टीचा लाभ मिळत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनेही हा निर्णय घेतला आहे.