Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 05:16 AM2024-11-24T05:16:11+5:302024-11-24T05:16:57+5:30

Vidhan Sabha Election Result 2024: ५८ मतदारसंघांत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून शिवसेना कुणाची या लढाईत शिंदेंनी बाजी मारली आहे. या निकालामुळे शिंदेंचे मनोबल वाढले आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024: Who will Chief Minister Now? Huge success for Mahayuti, loss for Mahavikas Aghadi | Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?

Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?

मुंबई - मतदारराजाने महाविकास आघाडीला मोठमोठे धक्के देत महायुतीच्या पारड्यात भरभरून दान टाकले आहे. भाजपला आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक जागा जागा देताना शिंदेसेना आणि अजित पवार गटालाही जनतेने राज्यशकट हाकण्यासाठी पुन्हा पाच वर्षे दिली. 

या निवडणुकीत भाजपला अगदी  अभूतपूर्व यश मिळाले आहे. १९९० मध्ये पक्षाने बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा छोटा भाऊ म्हणून निवडणूक लढवत ४२ जागांवर विजय मिळवला होता. २०२४ मध्ये १४९ जागांवर निवडणूक लढवत भाजपने तब्बल १३२ जागांवर विजय मिळवला आहे. पक्षाने या परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. यासह भाजप राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला.

फुटीनंतर कुणाची शिवसेना खरी, असा प्रश्न निर्माण झाला असताना सातत्याने बाळासाहेबांच्या विचारांचे खरे पाईक आम्हीच, असे वेळोवेळी शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी ठसवले. जागावाटपातील तडजोड स्वीकारून शिंदेसेनेने या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे. ५८ मतदारसंघांत शिंदे सेनेच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून शिवसेना कुणाची या लढाईत शिंदेंनी बाजी मारली आहे. या निकालामुळे शिंदेंचे मनोबल वाढले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या करिष्म्याने महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात कोणत्याही युती/आघाडीने पहिल्यांदाच सव्वादोनशेहून अधिक जागा जिंकण्याचा भीमपराक्रम केला. एकट्या भाजपला बहुमतासाठी केवळ आठ जागा कमी पडल्या. 

मुख्यमंत्री कोण होणार याची उत्कंठा

राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असतील याची उत्कंठा वाढली आहे. १३७ जागांसह सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला मुख्यमंत्रिपद मिळणार अशी जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले की, मुख्यमंत्रिपदाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही. तिन्ही पक्षांचे नेते (भाजपश्रेष्ठी, शिंदे आणि अजित पवार) एकत्र बसून निर्णय घेतील तो तिघांनाही मान्य असेल. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील असा दावा ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांची इच्छा आहे असे पक्षाचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले.

महायुती सरकारमधील निवडणूक लढलेले सर्व मंत्री जिंकले. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या फरकाने विजयी झाले.  सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा,  छगन भुजबळ, दिलिप वळसे पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, शंभूराज देसाई यांचा त्यात समावेश आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024: Who will Chief Minister Now? Huge success for Mahayuti, loss for Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.