Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 04:01 PM2024-11-01T16:01:54+5:302024-11-01T16:06:25+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेश पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या आधीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला आहे. पण त्यांनी पक्षात अजूनही प्रवेश केलेला नाही, आज पाटील यांनी बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. 'मोहोळ विधानसभेतील उमेदवार निवडून आणणार आणि सन्मानाने पक्षात प्रवेश करणार', अशी प्रतिक्रिया दिली.
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
आज बारामतीमध्ये पवार कुटुंबात दोन ठिकाणी पाडवा साजरा केला जात आहे. दोन ठिकाणी पाडवे होत यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना हे वेदनादायी असल्याचे पाटील म्हणाले. उमेश पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या भेटीत मोहोळ विधानसभा मतदारसंघाबाबत चर्चा झाली. उमेदवार विजयी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही उमेश पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना उमेश पाटील म्हणाले, बारामतीमध्ये उद्या फार गर्दी असते त्यामुळे आजच दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो.त्याचबरोबर माझ्या मतदारसंघातील काही चर्चा करायच्या होत्या, त्यासाठी आलो होतो. मोहोळ विधानसभा मतदारसंघात आम्ही राजू खरे उमेदवार दिले आहेत. या मतदारसंघासाठी आम्ही मार्गदर्शन घेण्यासाठी आलो होतो, असंही पाटील म्हणाले.
...यामुळे मोहोळची उमेदवारी बदलली
"मतदारसंघात राजन पाटील यांचे वर्चस्व आहे, ५० वर्षाचे त्यांचे साम्राज्य आहे. तिथे त्यांच्याविरोधातील घटक जास्त आहेत. या सगळ्यांचे उमेदवारीबाबत काही प्रश्न होते. त्यांना निवडून आणण्यात आम्हाला अडचणी येत होत्या. यशवंत माने यांच्याविरोधात भूमिपुत्र उमेदवार हवे होते, यशवंत माने भूमिपुत्र नाहीत, ते सोलापूर जिल्ह्यातील नाहीत. आता भूमिपुत्र असलेल्या राजू खरे यांना उमेदवारी दिल्यानंतर फरक पडणार आहे. कारण मोहोळ मतदारसंघात भूमिपुत्राची मागणी होत होती, रमेश कदम हे भूमिपुत्र नाहीत त्यामुळे ती अडचणीची ठरत होती. त्यामुळे ती बदलली, अशी माहिती उमेश पाटील यांनी दिली.
सन्मानाने पक्षात प्रवेश करणार
"मी शरद पवार यांना आमदार निवडून आणणार आणि मगच पक्षात सन्मानाने प्रवेश करणार असल्याचा शब्द दिला आहे. माझ्या मतदारसंघातील लोकांना माझी काळजी असणार आहे, त्यामुळे त्या जनतेसाठी मी अजित पवार यांच्यासोबत असलेले राजकीय संबंध बाजूला केले, मी मुळचा शरद पवार यांचा कार्यकर्त्या आहे. आपण शरद पवार यांच्याकडे काहीतरी मागत असताना त्यासाठी आपण आधी काहीतरी द्यायला पाहिजे, त्यासाठी आधी आमदार निवडून आणायचा मगच प्रवेश करायचा, असंही उमेश पाटील म्हणाले.
'पवार कुटुंबात फूट पडायला नको होती'
बारामतीमधील दोन पाडवा कार्यक्रमावर बोलताना उमेश पाटील म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांना, आमदारांना, खासदारांना हे कुटुंब एकत्र असायला पाहिजे असं वाटतं. मी अजित पवार यांच्या पक्षात मुख्य प्रवक्ता होतो, तिथल्याही आमदारांची भावना हे कुटुंब एकत्र असायला पाहिजे होतं अशी भावना आहे, ही फूट व्हायला नको होती,असंही पाटील म्हणाले.