Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 06:03 PM2024-11-15T18:03:34+5:302024-11-15T18:05:58+5:30
Rahul Gandhi Maharashtra Election 2024: राहुल गांधींनी महाराष्ट्रातील सोयाबीन, कांदा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा केल्या आहेत.
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी प्रचारात झोकून दिल्याचे दिसत. महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होत असून, दोन्ही आघाड्यांकडून सत्ता आल्यास काय करणार, याबद्दल मोठंमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असून, राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत राज्यात वेगवेगळ्या भागात शेतमालाला हमीभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठावाडा विदर्भात सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोयाबीनच्या किंमतीबद्दल मोठी घोषणा केली आहे. राहुल गांधी यांनी एक ट्विट केले असून, म्हटले आहे की, "महाविकास आघाडी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी पावले उचलणार आहे. सोयाबीनला प्रति क्विंटल ७००० हजार हमीभाव आणि बोनस दिला जाईल."
"कांद्याचा हमीभाव निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन करेल. त्याचबरोबर कापसाला योग्य हमीभाव देऊ", असे आश्वासन राहुल गांधींनी दिले आहे.
राहुल गांधींनी पुढे म्हटलं आहे की, "मागील तीन निवडणुकांपासून भाजप सोयाबीनला ६००० रुपये हमीभाव देण्याचे वचन देत आहे. पण, आजही शेतकरी रक्ताचं पाणी करून पिकवलेली सोयाबीन ३०००-४००० रुपयात विकत आहे. महाविकास आघाडी अन्नदात्यांना त्यांचा हक्क, मेहनतीचं फळ आणि न्याय देईल", असे राहुल गांधी म्हणाले.
महाविकास आघाड़ी महाराष्ट्र के किसानों के लिए ऐतिहासिक क़दम उठाने जा रही है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 15, 2024
- सोयाबीन के लिए ₹7,000/क्विंटल MSP + बोनस
- प्याज़ के लिए उचित क़ीमत तय करने वाली कमेटी
- कपास के लिए भी सही MSP
पिछले तीन चुनावों से भाजपा सोयाबीन के लिए 6000 रुपए की MSP का वादा कर रही है लेकिन आज…
लोकसभेला कांदा, विधानसभेला सोयाबीनचा मुद्दा
लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या मुद्दा जास्त गाजला होता. त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसल्याचे दिसले. आता विधानसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघात सोयाबीन किंमतीचा मुद्दा कळीचा बनला आहे. सोयाबीनची कमी किंमतीने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.