Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झिरो झिरो म्हणता अजित पवारांच्या वाट्याला एक जागा; महाराष्ट्रात कोण पुढे? १ वाजेपर्यंतचे आकडे आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 01:25 PM2024-06-04T13:25:02+5:302024-06-04T13:27:23+5:30

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे.

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Which party's candidates are leading in Maharashtra? | Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झिरो झिरो म्हणता अजित पवारांच्या वाट्याला एक जागा; महाराष्ट्रात कोण पुढे? १ वाजेपर्यंतचे आकडे आले समोर

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झिरो झिरो म्हणता अजित पवारांच्या वाट्याला एक जागा; महाराष्ट्रात कोण पुढे? १ वाजेपर्यंतचे आकडे आले समोर

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. महाराष्ट्रातीलही निकाल समोर आले आहेत. सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या कलानुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार लढत सुरू आहे. एक्झिट पोलने दिलेल्या अंदाजाच्या उलट निकाल समोर येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 

पलटीबाज नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू किंगमेकर ठरणार? काँग्रेसच्या दिल्लीत मोठ्या हालचाली

महाराष्ट्रात आघाडीवर कोण?

महाराष्ट्रातील निकाल समोर आले आहेत. दोन दिवसापूर्वी एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी १२ ते १५ जागांवर आघाडी घेऊ शकते असं दाखवण्यात आलं होतं, तर महायुती राज्यात २८ ते ३० जागांवर आघाडी घऊ शकते असं दाखवण्यात आलं होतं. पण, दुपारी १ वाजेपर्यंत आलेले निकाल या उलट असल्याचे दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी २७ जागांवर आघाडीवर आहे, तर महायुती २० जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. 

विदर्भातही महाविकास आघाडीच्या जागा आघाडीवर असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातही तशीच परिस्थिती दिसत आहे. दरम्यान, राज्यात चुरशीची लढत दिसत आहे. 

दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात १ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे आघाडीवर आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या, तर राम सातपुते पिछाडीवर होते. दरम्यान, राज्यात अनेक मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असल्याचं दिसत आहे. 

राज्यात लोकसभा निवडणुकीत जर महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून आल्या तर विधानसभेचं समिकरण बदलणार आहे. अनेक गेलेले आमदार महाविकास आघाडीमध्ये परत येऊ शकतात अंस बोलले जात आहे. 

 देशात कोण आघाडीवर?

लोकसभा निवडणुकीत देशातही चुरशीची लढत झाली आहे. दुपारी १ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, देशात एनडीए २९९ जागांवर आघाडीवर आहेत. तर इंडिया आघाडी १७३ जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर ७१ जागांवर आघाडीवर आहेत.  

Web Title: Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Which party's candidates are leading in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.