५०-५० कोटी देऊन आमदार, खासदार फोडले; राहुल गांधींचा दावा, ठाकरे गटातील...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 03:47 PM2022-11-17T15:47:36+5:302022-11-17T15:48:42+5:30
गांधी, नेहरू, पटेल वर्षभर जेलमध्ये राहिले परंतु त्यांनी इंग्रजांच्या पत्रावर सही केली नाही. सावरकरांनी केली असं राहुल गांधी म्हणाले.
अकोला - माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार भारत जोडो यात्रेत चालत होते. त्यांना ५० कोटींची ऑफर होती असं म्हणाले. ते गेले नाहीत पण बाकीचे गेले. एकप्रकारे विरोधकांमध्ये साफसफाई होत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत १०-१५ कोटी घेऊन चाललेल चांगली बाब आहे. भारतात स्वच्छ नेत्यांची कमी नाही त्यामुळे ते आमच्यासोबत येतील असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा आम्ही विदर्भाच्या सीमेवर होतो. तेव्हा आमच्या लोकांनी म्हटलं की, तुम्हाला गीत ऐकवायचं आहे. महात्मा गांधी वर्धाला गेले का? असा मला प्रश्न होतो. भारतात इतर जागा होत्या मग इथे का? असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा गीत ऐकल्यानंतर मी त्या गेटच्या आतमध्येच जात मला सर्व समजलं. काँग्रेसची विचारधारा आहे ती विदर्भात आहे. जो नैसर्गिक काँग्रेसी आहेत ते विदर्भात आहेत असं त्यांनी सांगितले.
सावरकर घाबरले होते
गांधी, नेहरू, पटेल वर्षभर जेलमध्ये राहिले परंतु त्यांनी इंग्रजांच्या पत्रावर सही केली नाही. सावरकरांनी केली. कारण त्यांच्या मनात भीती होती. जर भीती नसती तर त्यांनी सही केली नसती. ज्यावेळी सावरकरांनी सही केली तेव्हा भारतातील नेत्यांचा विश्वासघात केला. दोन विचारधारा आहे. मला तुमचा सेवक बनायचंय हे सावरकरांनी पत्रात इंग्रजांना लिहिलं होतं असं राहुल गांधींनी म्हटलं.
देशासमोरच्या महत्त्वाच्या समस्या कोणत्या?
युवकांना रोजगार मिळेल असा त्यांना विश्वास नाही. मला भेटलेल्या युवकांमध्ये एकही युवक भेटला नाही जो आत्मविश्वसाने मला नोकरी मिळेल असं म्हटलं नाही ही देशातील मोठी समस्या आहे. महागाई वाढतेय. तरुणांचे भविष्य बंद आहे. शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना कुठलेही मदत नाही. शेतीमालाला भाव मिळत नाही. कर्ज माफ होत नाही. सरकारी हॉस्पिटल, शाळा-कॉलेज बंद करतायेत. गॅस सिलेंडर महाग झाला. पेट्रोल दर वाढले. सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे कुठे जातायेत याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे असंही राहुल गांधी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"