मोदीसाहेब, तुमच्या नेत्यांनी केलेल्या ‘वादग्रस्त ’ वक्तव्यांची लाज वाटत नाही कां.. ? अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:30 PM2019-04-03T13:30:29+5:302019-04-03T13:45:26+5:30
भाजपवाले मोदींना विष्णूचा ११ वा अवतार सांगतात, हनुमानाची जात काढतात...
पुणे : सहा वर्षांपूर्वी मी जे बोलायला नको होतं ते अनावधानाने बोलून गेलो.. त्याची माफी मागितली, प्रायश्चित्त घेतलं, आत्मक्लेश सुध्दा करुन घेतला.. पुन्हा कुठं चुकलो का .. ? इतिहासातून शिकलो ना..पण ते वाक्याचा अजूनही संदर्भ दिला जातो.. पण तुमचे नेते शेतकऱ्यांच्या मुलांना लावरिस, साले म्हणतात , तसेच मुली पळविण्याचा सल्ला देतात , हुनमानाची जात देखील काढतात... त्याची लाज वाटत नाही का..? त्याचं काय, त्यांना तसे बोलण्याचा अधिकार कुणी दिला असा संतप्त सवाल अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींना केला..
पुण्यात काँग्रेसचे मोहन जोशी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. यावेळी या वेळी, काँग्रेसचे उल्हास पवार, हर्षवर्धन पाटील, इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे, अंकुश काकडे, सुप्रिया सुळे , कुमार सप्तर्षी यांच्यासह राष्ट्रवादी , काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते. पवार म्हणाले, भौजपाला त्यांनी पाच वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. या सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला असून असे वक्तव्य करुन ते जनतेची दिशाभूल करत आहे. मोदी देशाच्या कुटुंबाबद्द्ल बोलण्याएैवजी पवार कुटुंबियांबद्दल बोलत आहे. ते मी , माझी बहीण पाहून घेऊ असेही त्यांनी सांगत मोदींना लक्ष केले . तसेच २५ वर्ष शिवसेना सडली होती पण आता त्यांची सटकली आहे. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्यात केली.
आघाडीचे पुण्यातील उमेदवार मोहन जोशी आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच्या सभेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, शिवसेना 25 वर्ष सडली होती. भाजपला नालायक सरकार, अफजलखान म्हणणारे आता कुठे गेले.त्यांना काहीही व्हिजन नाही, विकास नाही. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे:
पुण्याच्या पाणी प्रश्नाकडे कुणाचं लक्ष नाही. मतं मागायला जातात. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे.पण तुम्हाला फक्त निवडणुका दिसतात का? मतं मागण्याआधी आम्ही दुष्काळ प्रश्नाला अग्रक्रम दिला. 45 वर्षात एवढी बेरोजगारी वाढली नव्हती.सरकारला बेरोजगारी , शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता आले नाही .वर्ध्याच्या सभेत आल्यावर आम्हाला अपेक्षा होती की मोदी, 5 वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनावर बोलतील. देशाच्या कुटुंबियांबाबत बोलण्याची गरज असताना पंतप्रधानांना पवार कुटुंबियांवर बोलण्याचे कारण काय होते?आश्वासनांचे हातभार गाजर काढलंय. आता गाजर पण लाजायला लागले. तसेच भाजपमधील अडवाणी , मुरली मनोहर जोशी यांचीपरिस्थिती काय झाली हे सर्वजण पाहतच आहोत..