“अमोल कोल्हे अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी, संसदेतही सर्वोत्तम कामगिरी”: सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 02:28 PM2024-04-15T14:28:18+5:302024-04-15T14:29:33+5:30
Supriya Sule News: अमोल कोल्हे यांनी मतदारसंघात खूप विकासकामे केली आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
Supriya Sule News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघाकडे केवळ राज्याचे नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. बारामतीसह राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गट आणि शरद पवार गट ज्या ठिकाणी एकमेकांसमोर ठाकले आहेत, त्या लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विविध ठिकाणी दौरे करत असून, शरद पवार गटाच्या उमेदवारांवर टीका करत आहेत. या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी पलटवार केला असून, अमोल कोल्हे यांचे कौतुक केले आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार म्हणाले की, तुम्हाला कार्यसम्राट खासदार पाहिजे की, नटसम्राट खासदार? असे म्हणत खासदार अमोल कोल्हे यांना टोला लगावला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना प्रत्युत्तर दिले.
अजित पवारांनी केलेल्या टीकेवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, हे दुर्देव आहे. अमोल कोल्हे हे एक अतिशय सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आहेत. अमोल कोल्हे यांचे संसदेतील काम सर्वोत्तम असून त्यांनी मतदारसंघात खूप विकास कामे केली आहेत. त्यामुळे कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, कार्यसम्राट की नटसम्राट माहिती नाही, पण स्वकर्तृत्वसम्राट नक्की! माझ्या काकांच्या पुण्याईवर डॉक्टर, अभिनेता नाही तर स्वकर्तृत्वावर माझी ओळख आहे, असा पलटवार अमोल कोल्हे यांनी केला.