No Confidence Motion: राहुल गांधींची मोदींना 'जादूची झप्पी' नव्हे 'झटका' होता - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 08:32 PM2018-07-20T20:32:12+5:302018-07-20T20:33:07+5:30
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास प्रस्तावार आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. अविश्वास प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी यांनी सुरुवातीला नरेंद्र मोदी सरकारवर आरोपाच्या फैरी झाडल्या. त्यानंतर त्यांनी भर सभागृहात नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींच्या या गळाभेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीबाबत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी राजकारणाच्या ख-या शाळेत गेले आहेत. त्यांनी पंतप्रधानांना दिलेली जादूची झप्पी नसून तो झटका होता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Mujhe lagta hai ki Rahul Gandhi politics ke asli paathshala mein ja chuke hain. Jis tarah se Modi ji ko jadoo ki jhappi lagaayi, woh jhappi nahi thi jhatka tha: Sanjay Raut, Shiv Sena #NoConfidenceMotionpic.twitter.com/8Nw2LM6GXW
— ANI (@ANI) July 20, 2018
दरम्यान, अविश्वास प्रस्तावादरम्यान नरेंद्र मोदी सरकारमध्ये सहभागी असलेल्या मित्र पक्ष शिवसेनेने तटस्थ भूमिका घेतली आहे. शिवसेनेने गुरुवारी व्हीप बजावत शिवसेनेच्या खासदारांना नरेंद्र मोदी सरकारच्या बाजूने मतदान करण्यास सांगितले होते. पण आज शिवसेनेने आपल्या भूमिकेबाबत पुन्हा संभ्रम निर्माण केला आहे.