घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा

By मोरेश्वर येरम | Published: January 5, 2021 08:45 PM2021-01-05T20:45:37+5:302021-01-05T20:48:19+5:30

महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही

no need to panic there is no outbreak of bird flu in Maharashtra says Forest Department | घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा

घाबरण्याचं कारण नाही, महाराष्ट्रात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव नाही; वनविभागाचा दिलासा

googlenewsNext
ठळक मुद्देमध्य प्रदेश आणि केरळसह राजस्थान, हिमाचलमध्ये 'बर्ड फ्लू'चा कहरमध्य प्रदेशात शेकडो कावळे मृत्यूमुखी, तर केरळमध्ये पोल्ट्री फार्मध्ये बर्ड फ्लूमहाराष्ट्रात बर्ड फ्लूची अद्याप एकही केस आढळली नसल्याचा दावा

मुंबई
देशात सध्या पाच राज्यांमध्ये 'बर्ड फ्लू'चा कहर सुरू आहे. पण महाराष्ट्रात अद्याप 'बर्ड फ्लू'ची एकही घटना आढळून आलेली नाही, अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे. 

"महाराष्ट्रात सध्या बर्ड फ्लूचं एकही प्रकरण आढळून आलेलं नाही. त्यामुळे घाबरुन जाण्याचं कोणतंही कारण नाही", असं मुख्य वन संरक्षक नितीन काकोडकर यांनी पीटीआयला सांगितलं. मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये 'बर्ड फ्लू'मुळे शेकडो कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर केरळ, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्येही 'बर्ड फ्लू'ची प्रकरणं समोर आली आहेत. 

केरळच्या कोझिकोड येथील दोन पोल्ट्री फार्मध्ये 'बर्ल्ड फ्लू' पसरल्याचं समोर आलं आहे. केरळमध्ये बर्ड फ्लूचा कहर वाढल्यानं हायअलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर केरळमध्ये 'बर्ड फ्लू'ला राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलं आहे. 'बर्ड फ्लू'ची फैलाव माणसांमध्येही होण्याची दाट शक्यता असते. याआधी २००६ साली महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात 'बर्ड फ्लू'चा फैलाव झाला होता. त्यावेळी हजारो कोंबड्यांना 'बर्ड फ्लू'ची लागण झाली होती. 
 

Web Title: no need to panic there is no outbreak of bird flu in Maharashtra says Forest Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.