भाजपामध्ये केवळ गडकरींमध्ये हिंमत; राहुल गांधींकडून खोचक स्तुती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:24 PM2019-02-04T21:24:59+5:302019-02-04T22:03:41+5:30
नागपुरमधील अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये नितीन गडकरी यांनी एका कार्यकर्त्यांचे उदाहरण देताना हा टोला हाणला होता.
नवी दिल्ली : ''जो व्यक्ती आपले घर चालवू शकत नाही, तो देश काय चालविणार'', या भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्तुती केली आहे. भाजपामध्ये केवळ तुमच्यामध्येच दम उरला असल्याचे ट्विट त्यांनी केले.
नागपुरमधील अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये नितीन गडकरी यांनी एका कार्यकर्त्यांचे उदाहरण देताना हा टोला हाणला होता. यावेळी गडकरी यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते. तसेच काही दिवसांपूर्वी गडकरी आणि राहुल गांधी हे शेजारी बसल्याचे दिसल्यावर त्यांच्यावर टीका झाली होती. तेव्हा गडकरी यांनी स्पष्टीकरण देत सरकारी प्रथेनुसार जर आपण राहुल गांधी यांच्या शेजारी बसलो तर गैर काय, असा सवाल उपस्थित केला होता.
Oops, Gadkari Ji.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 4, 2019
Huge apology. I forgot the most important one....
JOBS! JOBS! JOBS! JOBS! https://t.co/SfOLiCUoyg
जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार? गडकरींचा अप्रत्यक्ष टोला
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी गडकरी यांची केलेली स्तुती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरेधात आवाज न काढणाऱ्या भाजपातील नेत्यांना हाणलेला टोला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, स्तुती करताना राहुल यांनी गडकरी, थोडे राफेल घोटाळा-अनिल अंबानी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि लोकशाहीवरील संकटांवरही बोलावे, असे आव्हान दिले. त्यानंतर आणखी एक मुद्दा राहिला, असे रिट्विट करत नोकऱ्यांवरही बोला, असे सांगितले.
यावर गडकरी यांनी राहुल यांच्यावर पलटवार करत माझ्यातील हिमतीला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच तुम्हाला मिडिया पसरवत असलेल्या वृत्तांचा आधार घ्यावा लागत असल्याचे आश्चर्य वाटत आहे. हेच आमच्या सरकारचे यश असल्याचे म्हटले आहे.
@RahulGandhi जी, मेरी हिम्मत के लिए मुझे आप के सर्टिफिकेट की जरूरत नही है लेकिन आश्चर्य इस बात का है की एक राष्ट्रीय पार्टी के अध्यक्ष होने बाद भी हमारी सरकार पर हमला करने के लिए आपको मीडिया द्वारा ट्विस्ट किए गए खबरों का सहारा लेना पड़ रहा है।
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) February 4, 2019