काँग्रेसचे नेतृत्त्व करण्यासाठी राहुल गांधीच सक्षम - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:17 PM2020-08-27T15:17:06+5:302020-08-27T15:49:21+5:30
भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवे, असे संजय राऊत म्हणाले.
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसह २० हून अधिक सदस्यांनी पूर्णवेळ अध्यक्ष निवडीबाबत पत्र लिहिले होते. त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले असून सध्या देशात ज्यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्ते काम करतील, ते राहुल गांधी आहेत, यासाठी ते सक्षम आहेत, असे म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये जे काय घडले, त्यावर काँग्रेसने बोलले पाहिजे. काँग्रेस हा देशाला माहित असलेला मोठा पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे. देशाला मजबूत विरोधीपक्षाची गरज आहे. सोनिया गांधी यांचे वय ७० पेक्षा जास्त आहे. इतकी वर्ष त्या नेतृत्त्व करत आहे. प्रियंका गांधी पूर्णवेळ राजकारणात दिसत नाहीत. इतर ज्येष्ठ नेते मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत. संपूर्ण देशात ज्यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करतील ते राहुल गांधीच आहेत. ते सक्षम आहेत. काँग्रेसने या वादळातून सावरावे आणि जमिनीवर काम करावे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
याचबरोबर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याची मागणी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून करण्यात आली होती. याविषयी संजय राऊत यांनी सांगितले की, "उद्धव ठाकरे कधीही आडपदडा ठेवून बोलत नाहीत. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन लढायला हवे, हीच भूमिका त्यांनी मांडली. बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांनी करायला हवे. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल," असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी देशभरातील काँग्रेसच्या २० हून अधिक वरिष्ठ नेत्यांनी पक्षात मोठ्या बदलांची गरज असल्याचे मत त्यांनी पत्रातून व्यक्त केले होते. या नेत्याांनी पक्षाला पूर्ण वेळ आणि प्रभावी अध्यक्ष गरजेचा असल्याची महत्त्वाची मागणी सोनिया गांधी यांच्याकडे केली होती.त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला होता. मात्र, गेल्या सोमवारी काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांची पुन्हा पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली.
आणखी बातम्या...
उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपाशासित राज्यांचे नेतृत्व करावे- संजय राऊत
घर घेणाऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा दिलासा, 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात
Accenture पाच टक्के कर्मचारी कपात करणार, भारतीय स्टाफवरही होणार परिणाम
"मोदीजी, तुमच्याप्रमाणे विद्यार्थी 8000 कोटींच्या विमानातून परीक्षा द्यायला जात नाहीत"
'सुशांत सिंह राजपूतवर विषप्रयोग?', भाजपा नेत्याचा खळबळजनक दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात शक्तिशाली नेते, अभिनेत्री कंगना राणौतकडून ट्विट
आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार
CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...