"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:46 PM2024-11-06T16:46:47+5:302024-11-06T16:51:27+5:30
कोल्हे म्हणाले, "राज्यावर तब्बल साडे आठ कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षात ज्या पद्धतीने, असंवैधानिक पद्दतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करतण्यात आला, यानंतर एवढ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या राहून गेल्या असतील, तर महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की, मग हे सर्व केलं कशासाठी?"
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नुकताच आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. यात त्यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. यासंदर्भात बोलताना, "मला वाटते त्यात प्रिंटिंग मिस्टेक आहे. एक ओळ छापायची राहून गेली की, आम्ही तुम्हाला चंद्र आणून देऊ," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
कोल्हे म्हणाले, "राज्यावर तब्बल साडेआठ लाख कोटींचे कर्ज असताना अडीच वर्षात ज्या पद्धतीने, असंवैधानिक पद्दतीने पक्ष फोडून विकासासाठी जातो म्हणून सरकार स्थापन करण्याचा जो काही प्रयत्न करतण्यात आला, यानंतर एवढ्या गोष्टी पूर्ण करण्याच्या राहून गेल्या असतील, तर महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की, मग हे सर्व केलं कशासाठी?" एवढेच नाही तर, "या पद्धतीने पक्ष फोडून, चिन्ह पळवून, पक्षाचं नाव पळवून जे काही मिळालं, जे काही करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यातून काय साध्य झाले?" असा सवालही त्यांनी यावेळी केला.
"लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून आता बहीण झाली लाडलकी" -
लाडकी बहिण योजेवर बोलताना कोल्हे म्हणाले, "आपल्याला तर लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत ठोस माहिती आहे की, यामध्ये लोकसभेला मतांची झाली कडकी, म्हणून आता बहीण झाली होती लाडलकी. लाडकी बहीण योजनेची घोषणा करताना, त्याचे बजेटमध्ये हेड आहे का? इथून सुरुवात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची पेन्शनची योजना आहे... योजनेला कुठलाही विरोध नाही. मात्र, वस्तस्थिती काय आहे, याकडे बघणे अत्यंत आवश्यक आहे."
"गेल्या दोन-अडीच महिन्यांत आपण बघितले की, अनेक योजनांचा निधी, हा ठराविक योजनांकडे वळवण्यात आला आणि सर्व योजना वाऱ्यावर सोडण्यात आल्या. यानंतर, काही जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थीर ठेवण्याचे जे आश्वासन देण्यात आले, ते तर एवढे हासयस्पद आहे की, महाराष्ट्राचे अर्थमंत्री एकाही जीएसटी परिषदेला उपस्थित राहिलेले नाहीत. तर मग ते कोणत्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थीर ठेवणार आहेत." असा सवालही कोल्हे यांनी यावेळी केला.
"महायुतीचे हे आश्वास हा केवळ पोकळ दावा आहे. सत्तेत येणार नाही, हे माहीत असल्याने, वाट्टेल ती आश्वासने द्या, हेच या जाहीरनाम्यातून स्पष्ट दिसते." असेही कोल्हे यावेळी म्हणाले.