FIR नोंदवण्यासाठीही आंदोलन करावे लागेल का?, बदलापूरमधील घटनेवर राहुल गांधींचा संताप...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2024 07:57 PM2024-08-21T19:57:37+5:302024-08-21T19:58:43+5:30

"समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? "

Rahul Gandhi on Badlapur Crime News, says Do we have to protest to register an FIR? | FIR नोंदवण्यासाठीही आंदोलन करावे लागेल का?, बदलापूरमधील घटनेवर राहुल गांधींचा संताप...

FIR नोंदवण्यासाठीही आंदोलन करावे लागेल का?, बदलापूरमधील घटनेवर राहुल गांधींचा संताप...

Rahul Gandhi on Badlapur Crime News : बदलापूरमधील शाळेत शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. या अत्याचारानंतर सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे बदलापूरमधील हजारो नागरिक संतप्त झाले आणि अनेक तास बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन केले. याशिवाय, राज्यभरातून या घटनेवर तीव्र संताप व्यक्त होतो. दरम्यान, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बदलापूरातील 'त्या' शाळेवर शिक्षण विभागाची मोठी कारवाई; मंत्री दीपक केसरकरांचे आदेश

बदलापूरमधील लैंगिक शोषणाच्या घटनेबाबत राहुल गांधी यांनी सोशल मीडियाव पोस्टद्वारे सरकारवर निशाणा साधला. "पश्चिम बंगाल, यूपी, बिहारनंतर महाराष्ट्रातही मुलींवर होणारे लज्जास्पद गुन्हे आपल्याला विचार करायला भाग पाडतात की, समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत? बदलापुरातील दोन चिमुकलींवर घडलेल्या अत्याचारानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकांना रस्त्यावर यावे लागले. आता एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन करावे लागेल का? पीडितांना पोलिस ठाण्यात जाणेही इतके अवघड का झाले आहे?" असा सवाल त्यांनी यावेळी केला.

राहुल पुढे म्हणतात, "न्याय मिळवून देण्यापेक्षा गुन्हा लपविण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातात, ज्याचा सर्वात मोठा बळी महिला आणि दुर्बल घटकातील लोक आहेत. एफआयआर न नोंदवल्याने फक्त पीडित हतबल होत नाहीत, तर गुन्हेगारांना अभय मिळते. समाजातील महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत, याचा सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांना गांभीर्याने विचार करावा लागेल. न्याय हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, तो पोलिस आणि प्रशासनाच्या इच्छेवर अवलंबून राहू शकत नाही," असेही राहुल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले.

शाळेत काय घडले?
बदलापुरातील एका विद्यालयातील शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे(24) याने अत्याचार केला. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले. शाळेत तोडफोड केल्यानंतर काही आंदोलकांनी आपला मोर्चा बदलापूर रेल्वे स्थानकाकडे वळवला, दहा वाजता बदलापूर रेल्वे स्थानकातील रेल्वे वाहतूक आंदोलकांनी रोखली. परिणामी, अंबरनाथ स्थानकापुढील कर्जत, खोपोलीकडील रेल्वे वाहतूक वाम झाली. एकीकडे शाळेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरु होते, तर दुसरीकडे रेल रोको सुरू झाल्यामुळे पोलिस प्रशासनाची तारांबळ उडाली. 

आरोपीला फाशी देण्याची मागणी
आंदोलकांशी चर्चा करण्याकरिता मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ), जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाण्याचे पोलिस आयुक आशुतोष डुब्बरे यांनीही धाव घेतली. मात्र, त्यांनाही फारसे यश आले नाही. मंत्री बोलत असताना फाशी. फाशी.. अशा घोषणा दिल्या जात होत्या. अत्याचाराचे खटले फास्ट ट्राकवर चालविण्याचे आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल, याचे आश्वासन महाजन व शिनगारे देत होते. मात्र, आंदोलक जस्टिस जस्टिस…अशा घोषणा देत होते. यावेळी गिरीश महाजन यांनी तब्बल ताराभर आंदोलकांशी चर्चा केली. ते आंदोलकांना वारंवार शांत करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु आंदोलक ऐकत नव्हते. लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदोलकांशी चर्चा केली. तासभराच्या चर्चेनंतरही आंदोलन मागे घेतले जात नसल्याने पोलिसांनी दुपारी एकच्या सुमारास लाठीमार करावा लागला. 

पीडित कुटुंबाचं राज ठाकरेंना पत्र अन् मनसेमुळे बदलापूर प्रकरणाला वाचा फुटली, 'असा' होता घटनाक्रम

Web Title: Rahul Gandhi on Badlapur Crime News, says Do we have to protest to register an FIR?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.