राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जाला राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते सूचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 04:18 AM2017-12-04T04:18:12+5:302017-12-04T04:18:30+5:30
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर राज्यातील ३० ज्येष्ठ नेत्यांनी सूचक म्हणून स्वाक्ष-या केल्या आहेत.
मुंबई : काँग्रेस राष्टÑीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर राज्यातील ३० ज्येष्ठ नेत्यांनी सूचक म्हणून स्वाक्ष-या केल्या आहेत. हा उमेदवारी अर्ज आता महाराष्ट्र प्रदेश निवडणूक आधिकारी माजी खा. डॉ. महेश जोशी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, देशाचे माजी गृहमंत्री व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते शरद रणपिसे, माजी मंत्री आ. डॉ. पतंगराव कदम, रोहिदास पाटील, हर्षवर्धन पाटील, आ. नसीम खान, आ. बस्वराज पाटील, आ. सतेज पाटील, आ. निर्मला गावित, आ. यशोमती ठाकूर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास औताडे, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष माजी आ. एम. एम. शेख, प्रदेश पदाधिकारी नतिबोद्दीन खतीब, रमेश कीर यांनी अर्जावर स्वाक्षºया केल्या.
माजी खा. डॉ. महेश जोशी उद्या सोमवारी केंद्रीय निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे हे अर्ज सुपुर्द करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिली.