राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 09:51 PM2024-09-16T21:51:36+5:302024-09-16T21:51:56+5:30

Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : राहुल गांधींची जीभ कापणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस देईल, असे वादग्रस्त विधान शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

Sanjay Gaikwad on Rahul Gandhi: A case has been filed against Sanjay Gaikwad who made controversial statements about Rahul Gandhi | राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad on Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्यायिक संहितेच्या कलम 351(2), 351(3), 351(4) आणि 192 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत X हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. 

काय म्हणाले संजय गायकवाड?
बुलढाणा येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना आमदार संदय गायकवाड म्हणाले की, काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते, ते आता बाहेर आले आहे. बाबासाहेबांनी जातींना रिझर्व्हेशन दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा हे रिझर्व्हेशन रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला. आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. जो कापेल त्याला मी 11 लाख रुपये देणार. 

गायकवाडांच्या वक्तव्यावर भाजप काय म्हणाले?
शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याचे भाजपने समर्थन केले नाही. महाराष्ट्र भाजपचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना आमदाराच्या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी गायकवाड यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही. राजीव गांधी म्हणाले होते की, आरक्षण देणे म्हणजे मूर्खांना पाठिंबा देणे. आता राहुल गांधी म्हणतात की मी आरक्षण संपवणार. आम्ही एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांना जागरूक करू आणि राहुल गांधींच्या वक्तव्याबद्दल त्यांना माहिती देऊ, असे बावनकुळे म्हणाले. 

नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा... ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्याने राहुल गांधींवर बोलूच नये. अंथरूण बघून पाय पसरावे म्हणतात ना, तसे गायकवाडने आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत आहे.  

Web Title: Sanjay Gaikwad on Rahul Gandhi: A case has been filed against Sanjay Gaikwad who made controversial statements about Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.