सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींवर चौफेर टीका, शिवसेनाही मैदानात; मनिषा कायंदेंनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2022 05:41 PM2022-10-09T17:41:42+5:302022-10-09T17:53:08+5:30

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल वीर सावरकर यांच्यावर आरोप केले. वीर सावरकर यांच्यावरुन आता शिवसेनेने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.

Shiv Sena's Manisha Kayande criticized Rahul Gandhi for his statement on Veer Savarkar | सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींवर चौफेर टीका, शिवसेनाही मैदानात; मनिषा कायंदेंनी दिला मोलाचा सल्ला

सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींवर चौफेर टीका, शिवसेनाही मैदानात; मनिषा कायंदेंनी दिला मोलाचा सल्ला

googlenewsNext

मुंबई: काँग्रेसची भारत जोड यात्रा सुरू आहे. काल या यात्रेचा ३१ वा दिवस होता. काल राहुल गांधी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरएसएस आणि वीर सावरकर यांच्यावर निशाना साधला. “मला वाटते की आरएसएस इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळत होते, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करत सल्ला दिला आहे.

शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राहुल गांधींनी अशी विधाने करण्यापूर्वी विचार करायला हवा,असंही कायंदे म्हणाल्या आहेत.'सावरकरांनी स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांसाठी काम केले आणि त्याचा मोबदला त्यांना मिळाला, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती, तसेच त्यांनी टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ब्रिटिश राजवटीला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.

'राहुल गांधींनी सावरकरांविरोधात बोलण्यापूर्वी विचार करावा. त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि शिवसेनेचे सावरकरांबाबत तेच मत आहे, ते कधीही बदलणार नाही, असंही कायंदे म्हणाल्या. 

"आरएसएस'ने इंग्रजांना मदत केली"

स्वातंत्र्य लढ्यात भाजप कुठेही नव्हता, भाजप ही वस्तुस्थिती लपवू शकत नाही. काँग्रेस आणि त्यांचे नेते स्वातंत्र्यासाठी लढले आहेत."आम्ही फॅसिस्ट पक्ष नाही. आमचा पक्ष संवादावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे,सध्या निवडणूक जिंकण्यासाठी संघ म्हणून काम करावे लागेल, हे आम्हाला माहीत आहे. देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवणे हे देशविरोधी कृत्य आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्यांशी आम्ही लढणार आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.  

आरएसएस'ने इंग्रजांना मदत केली, सावरकरांना स्टायपेंड मिळत होते; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

रिमोट कंट्रोल' म्हणणे हा दोघांचा अपमान

यावेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, मला अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर आताच बोलायचे नाही. "काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लढणार्‍या दोन्ही उमेदवारांची स्वतःची भूमिका आहे तसेच त्यांचा स्वतःचा दृष्टिकोन आहे. कोणालाही 'रिमोट कंट्रोल' म्हणणे हा दोघांचा अपमान आहे.

Web Title: Shiv Sena's Manisha Kayande criticized Rahul Gandhi for his statement on Veer Savarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.