विजय वडेट्टीवारांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं; इंदापूरात राष्ट्रवादीला स्पष्ट शब्दातच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 12:18 AM2021-09-01T00:18:23+5:302021-09-01T00:38:14+5:30

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाची भूमिका ठरलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमचे सर्व सहकारी काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.

We will not leave the Indapur assembly seat, Vijay Vadettivar made it clear to NCP | विजय वडेट्टीवारांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं; इंदापूरात राष्ट्रवादीला स्पष्ट शब्दातच सांगितलं

विजय वडेट्टीवारांनी पुन्हा अजित पवारांना डिवचलं; इंदापूरात राष्ट्रवादीला स्पष्ट शब्दातच सांगितलं

Next
ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची भाजपचा डाव, काँग्रेस पक्ष नंबर एक राहणारराज्यामध्ये भाजपा सत्तेत असताना, ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई केली नाही. सध्या भारतीय जनता पार्टी दबाव तंत्राचा वापर करून, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

इंदापूर : दिल्लीतील भाजपचे सरकार ईडी व सीबीआय या यंत्रणेचा प्रचंड दुरुपयोग करून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा डाव करत आहे. परंतु, राज्यामध्ये भाजपा सत्तेत असताना, ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यांच्यावर कारवाई केली नाही. सुडाचा बदला घेण्याची भावना महाराष्ट्रात कधी नव्हती. अशी चुकीची परंपरा घातक ठरणारी आहे, अशी टीका राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.

इंदापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामधाम येथे मंगळवारी (दि. ३१) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते. या वेळी इंदापूर तालुक्याचे काँग्रेसचे  तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वडेट्टीवार म्हणाले, सध्या भारतीय जनता पार्टी दबाव तंत्राचा वापर करून, दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतले सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून न्याय मिळावा म्हणून शेतकरी झगडत आहेत. मात्र केंद्र सरकार अद्यापि शेतकऱ्यांना न्याय देऊ शकले नाही. उलट न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचा प्रचंड प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. भाजपाचे सरकार म्हणजे व्यापाऱ्यांचे सरकार आहे.  देश विकण्याचा धंदा केंद्र सरकारने चालवला आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.

इंदापूर विधानसभेची जागा आम्ही सोडणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या इंदापूरात सध्या दत्तात्रय भरणे आमदार आहे. ही जागा अजित पवारांसाठी महत्त्वाची आहे. याच जागेवरुन हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यात राजकीय मतभेद आहेत. मात्र आता यावरुन विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाची भूमिका ठरलेली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमचे सर्व सहकारी काँग्रेस पक्षाची ताकद तळागाळापर्यंत वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यामुळे आम्ही काही इंदापूरची विधानसभा सोडणार नाही. सध्या राज्यात काँग्रेस पक्षालाच जोरदार पाठिंबा मिळतो आहे. पुढच्या विधानसभेला महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष नंबर एक राहील, अशीही माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

Web Title: We will not leave the Indapur assembly seat, Vijay Vadettivar made it clear to NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.