उद्धव ठाकरे व राहुल गांधींना शेतीतील काय समजते? ते विरोधच करणार; नारायण राणेंचा प्रहार

By देवेश फडके | Published: January 7, 2021 03:15 PM2021-01-07T15:15:33+5:302021-01-07T15:18:37+5:30

केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार; भाजप नेते नारायण राणे यांचा घणाघात

What do Uddhav Thackeray and Rahul Gandhi understand about agriculture? They will oppose; Narayan Rane's attack | उद्धव ठाकरे व राहुल गांधींना शेतीतील काय समजते? ते विरोधच करणार; नारायण राणेंचा प्रहार

उद्धव ठाकरे व राहुल गांधींना शेतीतील काय समजते? ते विरोधच करणार; नारायण राणेंचा प्रहार

googlenewsNext
ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना शेतीमधील काय कळते? नारायण राणेंचा सवालशेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, त्यात समेट घडून येणार नाही : नारायण राणेंचा दावाकेंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांचा हिताचा : नारायण राणेंचे मत

कणकवली : केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांवरील बहुतांश बंधने काढून टाकण्यात आली आहेत. या केंद्र सरकारचे काही चुकलेले नाही. दिल्ली आणि अन्य ठिकाणी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार, अशी जोरदार टीका भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली. कणकवली येथे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ते बोलत होते. 

केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यांच्या नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली येणे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित होते. ''मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत कृषी विधेयक सादर करण्यात आले तेव्हा त्यावर चांगली चर्चा झाली. विरोधकांपैकी कुणीही कृषी विधेयकाला विरोध दर्शवला नाही. याउलट अनेक विरोधक सदस्यांनी या विधेयकाचे कौतुकच केले. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसला संधी असून, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही केले नाही. आता विरोध करताहेत. आंदोलन करताहेत. शेतकऱ्यांवर बंधने लादणारे कायदे व नियम मोडीत काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले'', असे नारायण राण यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी या देशातील प्रमुख घटक आहे. शेतकऱ्यांना सबळ आणि आर्थिक आघाडीवर समृद्ध करणे, कष्टकऱ्याला केलेल्या श्रमातून फायदा मिळवून देणे, या दृष्टिकोनातून कृषी कायदा तयार करण्यात आला आहे, असे नारायण राणे यांनी यावेळी नमूद केले. आपला शेतकरी बांधव कष्टाने जे पिकवतो, उत्पादन घेतो. त्याचा जास्त मोबदला मिळेल, अशा ठिकाणी त्यांनी माल विकावा. योग्य मोबदला मिळालाचे समाधान शेतकऱ्याला लाभले पाहजे. माल कुठे विकायचा? कसा विकायचा? दलालांमार्फत विकायचा का? कष्टाचे पैसै मिळाले नाहीत, तर तोट्यात जाऊन विकायचा? अशी बंधने कृषी कायद्यामुळे दूर होणार आहेत. ही सर्व बंधने काढून टाकली तर मग काय चुकले? का आंदोलने केली जात आहेत? ही आंदोलने राजकीय असून, यात समेट घडून येईल, असे मला वाटत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शेतीमधील काय समजते आणि शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला निघाले आहेत. आंदोलक शेतकरी ठराविक राज्यातील आहेत. आंदोलन करणारे बहुतांश दलाल आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला.

 

Web Title: What do Uddhav Thackeray and Rahul Gandhi understand about agriculture? They will oppose; Narayan Rane's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.