राहुल गांधींचा फोटो रावणाच्या भूमिकेत दाखवल्यावरून काँग्रेसचा संताप

By कमलेश वानखेडे | Published: October 6, 2023 06:06 PM2023-10-06T18:06:24+5:302023-10-06T18:07:37+5:30

देवडिया काँग्रेस भवनासमोर निदर्शने

Congress angry on bjp over Rahul Gandhi's photo being shown in the role of Ravana | राहुल गांधींचा फोटो रावणाच्या भूमिकेत दाखवल्यावरून काँग्रेसचा संताप

राहुल गांधींचा फोटो रावणाच्या भूमिकेत दाखवल्यावरून काँग्रेसचा संताप

googlenewsNext

नागपूर : भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा फोटो रावणाच्या भूमिकेत दाखविला. याचा निषेध करण्यासाठी नागपूर शहर काँग्रेस कमिटीतर्फे देवडिया काँग्रेस भवनासमोर निदर्शने करण्यात आली. राहुल गांधी यांच्याबाबत ‘नवयुग के रावण’ असा उल्लेख करण्याचाही निषेध करण्यात आला.

आ. ॲड. अभिजीत वंजारी, प्रदेश मिडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, युवक काँग्रेसचे महासचिव बंटी शेळके, प्रशांत  धवड,रमन पैगवार, गिरीश पांडव, आकाश तायवाडे, प्रा.दिनेश बानाबाकोडे, अल्पसंख्याक अध्यक्ष वसीम खान, महेश श्रीवास, सरफराज खान, आशीष दिक्षित, सुनिल जाधव, दिनेश तराळे, गोपाल पटटम, प्रविण गवरे आदींनी निदर्शने करीत भाजप नेत्यांविरोधात घोषणाबाजी आली.

राहुल गांधी जनसामान्यांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे पाहून भाजप नेते अस्वस्थ व विचलित झाले आहेत. त्यामुळेच ते एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत, अशी टीका आ. अभिजित वंजारी यांनी केली. यापुढे काँग्रेस कार्यकर्ते आपल्या नेत्याचा अपमान खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला. आंदोलनात पंकज निघोट, देवेंद्र रोटेले, पंकज थोरात, ईरशाद मलिक, युवराज वैद्य, ज्ञानेश्वर ठाकरे, राजेश पौनीकर, श्रीकांत ढोलके, सुनिता ढोले, रवि गौर, सुनिल पाटील, किशोर गीद, राहुल मोरे आदींनी भाग घेतला.

Web Title: Congress angry on bjp over Rahul Gandhi's photo being shown in the role of Ravana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.