काँग्रेसचा स्थापना दिवस यंदा नागपुरात होणार, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:50 PM2023-12-15T16:50:24+5:302023-12-15T16:54:20+5:30

या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Sonia, Rahul, Kharge to address rally in Nagpur on Congress foundation day on December 28, before lok sabha elections 2024 | काँग्रेसचा स्थापना दिवस यंदा नागपुरात होणार, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार!

काँग्रेसचा स्थापना दिवस यंदा नागपुरात होणार, लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार!

नागपूर : काँग्रेसचा १३९ वा स्थापना दिन सोहळा २८ डिसेंबरला नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नागपुरात काँग्रेस पक्षातर्फे मोठी रॅलीही आयोजित केली जाणार असून, त्यात पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. 

या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी देखील स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या रॅलीत सहभागी होतील. तसेच, या रॅलीमध्ये १० लाखांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत.

वेणुगोपाल यांनी बुधवारी (१३ डिसेंबर) संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींवरून भाजपवर निशाणा साधला आणि संसदेवर दोनदा हल्ला झाल्याचे सांगितले. केंद्रात भाजपची सत्ता असताना हे दोन्ही हल्ले झाले. संसदेत काय चालले आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे, असेही ते म्हणाले. तसेच, भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवालही वेणुगोपाल यांनी केला. ते म्हणाले की, भाजपाच्या राजवटीला जनता कंटाळली आहे.

दरम्यान, संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत विरोधी पक्ष सातत्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निवेदन देण्याची मागणी करत आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते गिरिराज सिंह यांनी वेळ येऊ द्या, ते प्रत्येक गोष्टीचे उत्तर देऊ. विरोधकांना संसद गहाण ठेवायची आहे, असे म्हटले आहे. "तुकडे तुकडे गँग गृहमंत्र्यांकडे जाब विचारत आहे. तपास पूर्ण होऊ द्या, तुकडे तुकडे टोळीला चोख प्रत्युत्तर मिळेल. दहशतवादी आणि अतिरेक्यांना जात नसते", असे ट्विटद्वारे गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.

Web Title: Sonia, Rahul, Kharge to address rally in Nagpur on Congress foundation day on December 28, before lok sabha elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.