ट्रीपल इंजिन सरकार आता एकमेकांना धक्के मारत आहे, विजय वडेट्टीवारांनी पुन्हा डिवचले
By कमलेश वानखेडे | Updated: August 30, 2023 14:54 IST2023-08-30T14:52:25+5:302023-08-30T14:54:41+5:30
सरकारवर साधला निशाणा

ट्रीपल इंजिन सरकार आता एकमेकांना धक्के मारत आहे, विजय वडेट्टीवारांनी पुन्हा डिवचले
नागपूर : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सातत्याने महायुती सरकारवर प्रहार करताना दिसत आहेत. आता त्यांनी ‘ट्रीपल इंजिन सरकार मधील इंजिन एकमेकांना आता धक्के मारत आहेत’, असे ट्वीट करीत सरकारवर निशाणा साधला आहे.
वडेट्टीवार यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांवर बंधन घातली.. पण पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांनी घातलेली बंधन हटवल्याचे वृत्त आले आहे. यातून सरकारची नाचक्की झाली. सरकार मध्ये कोणत्याही विषयावर एक धोरण नाही, फक्त आपआपल्या पक्षाच्या नेत्यांसाठी सरकार मधील तिन्ही पक्ष राबत आहेत. सर्वसामान्यांचे सरकार असे काम करते का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.