Bharat Jodo Yatra: चिमुकलीचा महिनाभरापासूनचा हट्ट राहुल गांधींनी केला पूर्ण

By श्रीनिवास भोसले | Published: November 10, 2022 12:04 PM2022-11-10T12:04:12+5:302022-11-10T12:04:41+5:30

नांदेड तालुक्यातील तळणी येथील गीतांजली कल्पेश सूर्यवंशी यांची चिमुकली कनक हिने राहुल गांधी यांच्या भेटीचा आग्रह धरला होता.

Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi fulfilled the child's insistence for a month | Bharat Jodo Yatra: चिमुकलीचा महिनाभरापासूनचा हट्ट राहुल गांधींनी केला पूर्ण

Bharat Jodo Yatra: चिमुकलीचा महिनाभरापासूनचा हट्ट राहुल गांधींनी केला पूर्ण

googlenewsNext

नांदेड :राहुल गांधीच्या भारत जोड यात्रेसंदर्भात सुरू असलेली चर्चा आणि  वाहिन्यांवरील बातम्या पाहून चिमुकलीने राहुल गांधी यांच्याशी भेटण्याचा हट्ट मम्मीकडे धरला. राजकीय नेत्यांकडून प्रयत्न करूनही भेट न झालेल्या चिमुकलीची बुधवारी अचानक भेट झाल्याने तिचा आंनद गगनात मावेनासा झाला. ह्ये क्युटी म्हणून सुरू झालेल्या संवाद... बहीण-भावाच्या खोडयांपर्यंत येऊन पोहचला.

नांदेड तालुक्यातील तळणी येथील गीतांजली कल्पेश सूर्यवंशी यांची चिमुकली कनक हिने राहुल गांधी यांच्या भेटीचा आग्रह धरला, हा बालहट्ट पूर्ण करण्यासाठी सूर्यवंशी कुटुंबीयांनी स्थानिक नेते मंडळींकडून प्रयत्नही केले. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने नेत्यांनाच भेटणं अवघड असताना चिमुकलीचा हट्ट ते तरी कुठून पूर्ण करणार. सर्वांनीच हात टेकले. मात्र, कनकची ममी मुलीच्या हट्टापोटी पदयात्रेत पोहोचली.

दरम्यान, त्या ठिकाणी असलेल्या एका भारत यात्रीसोबत संवाद साधून तिच्या मम्मीने केवळ माझ्या मुलीचा मॅसेज त्यांना देण्याचा आग्रह धरला. सदर यात्रीने मॅसेज दिला. परंतु, त्यांच्या सेक्युरीटीने नकार दिला. तेवढ्यात कॅम्प एकमधून बाहेर पडताना चिमुकलीने राहुल गांधी यांना आवाज दिला अन त्यांनादेखील ह्ये क्युटी म्हणत तिला आत सोडा असे सांगितले. त्यानंतर कनकला कडेवर घेत तिच्याशी हितगुज केले. व्हॉट इज युअर नेम...असे विचारताच कनक असे सांगितले. त्यानंतर झालेल्या गप्पांमध्ये बहीण-भावातील खोड्या रंगल्या आणि हा संवाद राहुल गांधी यांनीदेखील यांनी त्यांच्या भाषणातही सांगितला.

Web Title: Bharat Jodo Yatra: Rahul Gandhi fulfilled the child's insistence for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.