"आम्ही संविधान वाचवले म्हणून मोदी पंतप्रधान झाले", मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 08:45 AM2022-11-11T08:45:48+5:302022-11-11T08:47:03+5:30

Mallikarjun Kharge : काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले. काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

Modi became Prime Minister because we saved the Constitution, Mallikarjun Kharge's attack on BJP | "आम्ही संविधान वाचवले म्हणून मोदी पंतप्रधान झाले", मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

"आम्ही संविधान वाचवले म्हणून मोदी पंतप्रधान झाले", मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

googlenewsNext

नांदेड : कन्याकुमारीपासून निघालेल्या खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचे नांदेडकरांनी जोरदार स्वागत केले. कुठे डोक्यावर पुष्पवृष्टी तर कुठं गुलाबांच्या पाकळयांच्या पायघड्या पाहुन भारत जोडो यात्रीही भाराहून गेले. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले. काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. याशिवाय, बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला सवाल केला. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? आता फक्त 75,000 नोकऱ्या देत आहेत. 18 कोटी नोकऱ्या कुठे आहेत? असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 

"भाजप नेते अनेकदा विचारतात की, काँग्रेसने देशासाठी काय केले. काँग्रेस सरकारने स्थापन केलेल्या पीएसयू आता विकल्या जात आहेत. आम्ही संविधान वाचवले, म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात", असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, मोदी सरकार विमानतळ आणि बंदरे विकत असून देशाची संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात जात असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही - राहुल गांधी
विमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत. इकडे पंपचे बटन दाबले की तिकडे तुमच्या खिशातील पैसा थेट उद्योगपतींकडे जातो, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत हल्लाबोल केला.  

...अन् मुलांना टॅब दाखविला
सॉफ्टवेअर इंजिनीअर बनण्याचे ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा राहुल गांधी यांनी कॉम्प्युटर बघितले का? असे विचारले, तेव्हा विद्यार्थ्यांनी नाही, असे सांगताच रस्त्याच्या एका कठड्यावर बसून राहुल गांधींनी या विद्यार्थ्यांना स्वत:जवळचा टॅब दाखविला. भारत जोडो यात्रा नांदेड शहराकडे येत असताना गुरुवारी हा प्रसंग घडला. 

Web Title: Modi became Prime Minister because we saved the Constitution, Mallikarjun Kharge's attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.