काँग्रेस अध्यक्षपदी राहूल गांधी यांच्यानिवडीचे नाशकात फटाके फोडून स्वागत, पदाधिकाऱ्यांनी वाटले पेढे, ढोल ताशाच्या तालावर थिरकले कार्यकर्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 04:48 PM2017-12-16T16:48:01+5:302017-12-16T16:51:29+5:30
काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहूल गांधी यांची निवड झाल्याने नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले.
नाशिक : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहूल गांधी यांची निवड झाल्याने नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढया कमी वयाचे नेतृत्व लाभले असून राहूल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र सांभाळताच शहरातील काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पेढे वाटून शनिवारी (दि.16)आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
काँगेस कमिटीमध्ये ह्यनवे नेतृत्व, नवा जोशह्ण असे चित्र पहायला मिळाले. राहूल गांधी यांनी काँग्रेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा पद्भार स्विकारल्यामुळे नाशिक शहर व जिल्हाभरातील काँग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून प्रमुख पदाधिकारी व कार्यत्र्यानी काँग्रेस कमिटीच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात एकत्र येऊन जल्लोष साजरा केला. काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांनी एमजी रोडवर फटाके फोडून आनंद व्यक्त केला. तर काही कार्यकर्त्यांनी चक्क ढोलताशाच्या तालावर ठेक्यावर धरला. त्यामुळे राहूल गांधी यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने स्थानिक कार्यकर्ते तथा पदाधिकाऱ्यांमध्ये नवीन उर्जा निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, नगरसेवक शाहू खैरे, वत्सला खैरे, आशा तडवी, माजीनगरसेवक लक्ष्मण जायभावे काँग्रेसच्या शहर प्रवक्ता हेमलता पाटील हनिफ शेख, बबलू खैरे, वसंत ठाकूर, ज्युली डिसुजा आदि उपस्थित होते.दरम्यान, राहूल गांधी यांच्या निवडीविषयी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह संचारला असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहेत. राहूल गांधी यांना राजकारण आणि समाजकारणाचे बाळकडू कटुंबातूनच मिळाले असून धर्मनिरपेक्षता, पुरोगामी विचारसरणी, त्याग, बलिदानचे पाठही त्यांना स्वत:च्या घरातून मिळाले आहेत. यासर्व गोष्टी जवळून बघणारे व नुकत्याच झालेल्या गुजरात निवडणुकांतून राजकीय परिक्वतेचे दर्शन घडविणारे राहूल गांधी काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष होणो हे अभिमानास्पद अशल्याचे मत पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.