गांधी परिवारास पुन्हा एसपीजी सुरक्षा प्रदान करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 06:27 PM2019-11-11T18:27:03+5:302019-11-11T18:31:27+5:30

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतल्याने संपूर्ण देशभरात सरकारविरोधात निषेध व्यक्त होत असताना नाशिकमध्येही सोमवारी शहर, जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे भाजप सरकारविरोधात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून गांधी परिवाराला पुन्हा एसपीजी सुरक्षा  कवच प्रदान करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

Demand for SPG security again for Gandhi family | गांधी परिवारास पुन्हा एसपीजी सुरक्षा प्रदान करण्याची मागणी

गांधी परिवारास पुन्हा एसपीजी सुरक्षा प्रदान करण्याची मागणी

Next
ठळक मुद्देएसपीजी सुरक्षा काढल्याने गांधी परिवाराच्या सुरक्षेला धोकाकाँग्रेसच्या नेत्याची सुरक्षा केंद्र सरकारकाने धोक्यात आणलीनाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचा केंद्र सरकारवर आरोप

नाशिक : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा केंद्र सरकारने काढून घेतल्याने संपूर्ण देशभरात सरकारविरोधात निषेध व्यक्त होत असताना नाशिकमध्येही सोमवारी शहर, जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे भाजप सरकारविरोधात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाच्या माध्यमातून गांधी परिवाराला पुन्हा एसपीजी सुरक्षा  कवच प्रदान करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
केंद्र सरकाने गांधी परिवारातील सदस्य तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचे एसपीजी (विशेष सुरक्षा दल) सुरक्षा काढून घेतल्याने देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या सरकारवर टिकेची झोड उठविली असून केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद सोमवारी नाशिकमध्येही पाहायला मिळाले. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीकेंद्र सरकारच्या  निर्णयाविरोधात आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. जगभरात शत्रू राष्ट्रांमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना संपवण्याचा डाव काही शत्रू आखत असून यातूनच भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांच्या हत्या झाल्याचा पूर्व इतिहास असताना गांधी परिवाराचे सुरक्षा कवच काढून के द्र सरकार त्यांची सुरक्षा धोक्यात आणल्याचा आरोपही काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी या निवेदनाच्या माध्यमातून केला आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस नेत्यांची काढलेली ‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था पुन्हा प्रदान करण्यात यावी अशी मागणीही काँग्रेसच्या नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमीटीतर्फे  जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. यावेळी नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, प्रदेश सरचिटणीस चारुशीला काळे, महिला अध्यक्ष वत्सला खैरे, स्विकृत सदस्य पोपटराव नागपुरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष हनीफ बशीर, सरचिटणीस सुरेश मारु, निलेश  खैरे, उद्धव पवार,  कैलास कडलग, विजय पाटील, मोहन करंजकर, ज्युली डिसुझा, कुसुम चव्हाण, रामकिसन चव्हाण, अण्णा मोरे, सचिन दीक्षित, राजकुमार जेफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Demand for SPG security again for Gandhi family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.